पुणे

प्रवासी भाड्याच्या वादातून लोणावळ्यात तरुणावर हल्ला

CD

लोणावळा, ता. ९ : लोणावळ्यात प्रवासी भाडे घेण्याच्या वादातून एका तरुणासह त्याच्या भावाला मारहाण केल्याची घटना वलवण परिसरात घडली. या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी चार जणांसह इतर चार अनोळखी अशा आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सुमारास वलवण गावच्या हद्दीत मॅप्रो गार्डनजवळील फूड कोर्टसमोर आणि परिसरात घडली. याप्रकरणी शंकर नानासाहेब लेंडवे (वय २९, रा. सावरोली, ता. खालापूर, जि. रायगड) यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, अतुल संजय फाटक याने त्याच्या ओळखीचे शुभम पानसरे, अक्षय भोंगळ आणि ऋषिकेश रामगुडे (रा. वलवण) यांच्यासह अन्य चार जणांना बोलावून घेतले. त्यानंतर, शिवीगाळ व दमदाटी करत ‘लोणावळ्यात प्रवासी भाड्याने घेणे बंद कर, अन्यथा तुला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी देत फिर्यादी शंकर लेंडवे आणि त्यांचे भाऊ प्रवीण शिंदे यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात आरोपींनी लाकडी दांडके आणि दगडांचा वापर करत गंभीर दुखापत केली. ऋषिकेश रामगुडे याने कोयता फेकून मारल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. तसेच अतुल फाटक याने फिर्यादीच्या गळ्यातील चांदीची साखळी जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनामुळे रद्द केलेल्या गाड्यांची यादी समोर, राजधानी एक्सप्रेसह ६ गाड्यांचा समावेश

Four State Bypoll Results : राहुल गांधींवर पुन्हा नरेंद्र मोदी भारी, काँग्रेसचा दारूण पराभव, चार राज्यांतील पोटनिवडणुकांचे निकाल हाती आले

Chandrashekhar Bawankule: सर्वजातीय विद्यार्थ्यांसाठी एकत्रित वसतिगृह उभारणार, चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

BHUVNESHWAR KUMAR: ४ वर्षांनी भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियात कमबॅक का झालं? कारण समोर; सहाय्यक प्रशिक्षक सितांशू कोटकने काय सांगितलं?

Madhuri Elephant News : माधुरी हत्तीणीप्रकरणी पेटाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; २५ हजारांचा दंड, रक्कम उपचारांसाठी वापरण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT