Lonavala Crowd sakal
पुणे

Lonavala News : लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी

महाराष्ट्राची पर्यटननगरी असा लौकिक असलेल्या लोणावळा व खंडाळ्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

लोणावळा - महाराष्ट्राची पर्यटननगरी असा लौकिक असलेल्या लोणावळा व खंडाळ्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. दाट धुके आणि पावसाच्या सरी अंगावर झेलत वर्षाविहारासाठी रविवारी पर्यटकांची गर्दी दिसत होती.

लोणावळ्यात सध्या पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. रविवारी सकाळी १२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. येथील थंड व आल्हाददायी वातावरणासह वर्षाविहाराचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत. पर्यटन हा लोणावळा आणि खंडाळ्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे.

शनिवार, रविवार सुट्यांमुळेही वर्षाविहरासाठी पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. लायन्स पॉइंट, राजमाची उद्यान, भुशी धरण, भाजे लेणी, धबधबा, कार्ला लेणी पर्यटकांच्या सर्वाधिक आकर्षणाचे मुख्य केंद्र आहेत. हे पॉइंट पर्यटकांच्या गर्दीने दिवसभर गजबजून गेली होती. पवना परिसरालाही पर्यटक भेटी देत आहेत. गेल्या रविवारी भुशी येथे घडलेल्या दुर्घटनेचे सावट या वीकेंडला पर्यटनावर होते.

पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात आली असून, पर्यटकांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी लोणावळा पर्यटकांनी हाउसफुल्ल झाले होते. पर्यटकांनी आपला मुक्काम खासगी बंगले आणि ग्रामीण भागाकडे वळविला आहे. येथील प्रसिद्ध चिक्की, जेली खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडते आहे.

मात्र, वाहतुकीच्या समस्येमुळे वाहनांना कुठेही थांबण्यास पोलिसांच्यावतीने मनाई करण्यात येत आहे. पर्यटनस्थळी बंदोबस्त आणि वाहतूक नियंत्रणासाठी लोणावळा परिसरात सात अधिकारी, ७० पोलिस कर्मचारी आणि ३० स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सायंकाळी पाचनंतर प्रवेश नाही

वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत असून, भुशी धरण, लोहगड किल्ला, भाजे, लायन्स पॉइंट आदी पर्यटन स्थळांवर खबरदारी घेण्यात येत आहे. सायंकाळी पाच वाजल्यानंतर याठिकाणी पोलिसांच्या वतीने पर्यटकांना मनाई करण्यात येत आहे. देवळे रस्ता, भाजे तसेच भुशी परिसरात वाहनांच्या काहीकाळ रांगा लागल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT