पुणे

वृद्धांमधील एकटेपणा ‘मूक महासाथ’

CD

एकटेपणा ही ज्येष्ठांमधील ‘मूक महासाथ’

मानसिक-शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम; नियमित संवाद आवश्यक

नवी दिल्ली, ता. १२ (पीटीआय) : ज्येष्ठ नागरिकांना जाणवणारा एकटेपणा ही गंभीर मात्र अनेकदा दुर्लक्षित राहणारी समस्या आहे. त्याचा मानसिक अन् शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. कुटुंबासोबत राहत असतानाही ज्येष्ठ व्यक्तींना एकाकीपणा जाणवू शकतो. दीर्घकाळ सामाजिक संपर्कापासून दूर राहिल्याने ही समस्या अधिक तीव्र होते.

सीताराम भरतिया रुग्णालयातील वृद्ध-वैद्यकशास्त्र विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. हरजित सिंग भट्टी यांनी सांगितले, की एकटेपणा म्हणजे केवळ एकटे राहणे नव्हे, तर इतरांपासून तुटल्याची, दुर्लक्षित झाल्याची किंवा अर्थपूर्ण नात्यांपासून वंचित राहिल्याची भावनिक अवस्था आहे. बदलती कौटुंबिक रचना, शहरीकरण, तरुणांचे रोजगारासाठी स्थलांतर आणि विभक्त कुटुंबपद्धतीमुळे ही समस्या गुंतागुंतीची झाली आहे. जोडीदार गमावलेले, एकटे राहणारे, अपंगत्व असलेले किंवा दीर्घकालीन आजारांनी त्रस्त असलेले ज्येष्ठ एकाकीपणासाठी अधिक असुरक्षित असतात. निवृत्तीनंतर तसेच मुले अन्य शहरांत किंवा परदेशात गेल्यानंतर सामाजिक संपर्क आणखी कमी होऊ शकतो.

दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) राष्ट्रीय वृद्धत्व केंद्रातील प्राध्यापक डॉ. अविनाश चक्रवर्ती यांच्या मते, एकटेपणा हा वृद्धत्वामध्ये अपरिहार्य आहे, या दृष्टीने न पाहता आरोग्यविषयक समस्या म्हणून पाहिले पाहिजे. सामाजिक संपर्क कमी झाल्यास झोप, भूक, शारीरिक हालचाल, मनःस्थिती आणि औषधोपचारांचे नियमित पालन यांवर परिणाम होतो. हालचालींतील अडचणी, ऐकण्याच्या समस्या किंवा ‘आपली आता गरज उरलेली नाही’ ही भावना यामुळे अनेक ज्येष्ठ सामाजिक उपक्रमांपासून दूर जातात. एकटेच राहू लागतात.

दीर्घकाळच्या एकटेपणामुळे तणाव वाढून झोपेचे विकार, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. तसेच नैराश्य, चिंता आणि बौद्धिक क्षमतेतील घसरणीशीही त्याचा संबंध असल्याचे ‘आयएमएस-बीएचयू’चे डॉ. अनुप सिंग यांनी सांगितले. त्यामुळे आरोग्य तपासणीच्या वेळी ज्येष्ठ व्यक्ती कोणाशी संवाद साधतात, सामाजिक उपक्रमांत किती सहभागी होतात आणि त्यांना आधाराची भावना आहे का, याचीही माहिती घेणे आवश्यक आहे.

नियमित संवाद, एकत्र भोजन घेणे, फिरायला जाणे, कौटुंबिक निर्णयांत ज्येष्ठांचा सहभाग आणि त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे, यामुळे एकटेपणा कमी होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिक मंडळे, सामुदायिक केंद्रे, स्वयंसेवा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आंतरपिढी उपक्रमही उपयुक्त ठरतात. दूरध्वनी, ‘व्हिडिओ’ संभाषण आणि समाजमाध्यमांमुळे दूर राहणाऱ्या कुटुंबीयांशी संपर्क टिकवता येतो. वाढत्या वृद्ध लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर निरोगी आणि अर्थपूर्ण वृद्धापकाळासाठी या समस्येकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Marathi News Live Updates: ...तर आम्ही रस्त्यावर उतरु- बबनराव तायवाडे

SCROLL FOR NEXT