फुले वाडा - शिक्षण व रोजगाराच्या हक्कासाठी राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या लॉंग मार्चला गुरुवारी सुरवात झाली.
फुले वाडा - शिक्षण व रोजगाराच्या हक्कासाठी राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या लॉंग मार्चला गुरुवारी सुरवात झाली. 
पुणे

शिक्षण, रोजगाराच्या हक्कासाठी लाँग मार्च

सकाळवृत्तसेवा

पुणे - शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महात्मा फुले वाड्यातून गुरुवारी लाँग मार्चला सुरवात झाली. सरकारने शाळा बंद करण्याचे धोरण अवलंबिले, अवैज्ञानिक अभ्यासक्रम तयार करणे, आदिवासी - मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बंद करणे, शिक्षक भरतीसह संपूर्ण नोकरभरती बंद करणे याविरोधात हा लाँग मार्च मुंबईत मंत्रालय येथे धडकणार आहे. 

‘‘शिक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या मालकीचे’, ‘के जी टू पीजी मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे,’ अशा घोषणा देत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले विद्यार्थी या मोर्च्यात सहभागी झाले होते. मोर्च्यामध्ये विद्यार्थिनींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. डॉ. बाबा आढाव, पन्नालाल सुराणा, सुरेश खैरनार, आमदार कपिल पाटील, आमदार सुधीर तांबे, जे. यू. नाना ठाकरे, सुभाष वारे, नगरसेविका अश्‍विनी कदम, अल्लाऊद्दीन शेख, विनय सावंत, संदेश भंडारे, जाकीर अत्तर, प्रमोद दिवेकर आदी उपस्थित होते. आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी व पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला. या मोर्च्याचे संपूर्ण नियोजन दत्ता ढगे, लोकेश लाटे, रशीद मणियार, शिवराज सूर्यवंशी, प्रशांत दांडेकर, संदीप आखाडे, राकेश पवार, सागर भालेराव, कीर्ती इटकर, अनिकेत घुले यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT