long metro line runs inside the blue flood line of Mutha river Petition pune Metro canceled by NGT sakal
पुणे

Pune Metro : मेट्रोसंदर्भातील याचिकाही ‘एनजीटी’कडून रद्दबातल

एनजीटीचे न्यायिक सदस्य दिनेशकुमार सिंग आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. विजय कुलकर्णी यांनी हा निकाल दिला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मुठा नदीच्या निळ्या पूररेषेच्या आतून मेट्रोचा सुमारे दीड किलोमीटर लांबीचा मार्ग जात आहे. यासाठी पिलर उभारण्यात आले असून, त्यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पूरपातळीत वाढ होणार असल्याबाबत पर्यावरणवाद्यांनी दाखल केलेली याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) रद्दबातल केली आहे.

एनजीटीचे न्यायिक सदस्य दिनेशकुमार सिंग आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. विजय कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. पूरपातळीसह इतर बाबींचा उल्लेख असलेली याचिका माजी खासदार अनू आगा, आरती किर्लोस्कर, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सारंग यादवाडकर यांच्यासह इतरांनी दाखल केली होती. ऑक्टोबर २०१७ मध्ये एनजीटीने नदीपात्रातील बांधकामांच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. या समितीने जानेवारी २०१८ मध्ये मेट्रो पिलरमुळे पूरपातळीत जास्तीत जास्त १२ मिलिमीटर वाढ होर्इल, असा अहवाल सादर केला होता. त्याआधारे एनजीटीने नदीपात्रातील बांधकामाला हिरवा कंदील दिला होता.

या प्रकरणात पुणे महापालिकेच्या वतीने अ‍ॅड. राहुल गर्ग यांनी बाजू मांडली. हा प्रकल्प सार्वजनिक हिताचा आहे. मोठ्या संख्येने जनतेला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाला काही बाधा आली, तरी त्याची योग्य ती काळजी घेतली जात आहे. त्यामुळे या प्रकल्पात हस्तक्षेप करणे योग्य वाटत नाही. तसेच पिलरचे काम आधीच पूर्ण झाले आहे, असे एनजीटीने निकालात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT