पुणे

पुणे : मार्चपासून लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुटणार हडपसरमधूनही!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेले हडपसर येथील रेल्वे टर्मिनल मार्च महिन्यात कार्यान्वित करण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे. त्यानंतर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या हडपसरमधून सोडण्यात येतील, अशी माहिती पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी गुरुवारी दिली.

शर्मा यांची नुकतीच पुणे विभागीय व्यवस्थापकपदी नियुक्ती झाली आहे. विभागात राबवावयाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.
हडपसर रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण करून तेथे सॅटेलाइट टर्मिनल उभारण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला होता. त्यासाठी रेल्वेला मोठ्या प्रमाणात जागेची आवश्‍यकता होती. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात तेथे जागा उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे हे सॅटेलाइट टर्मिनल तीन हेक्‍टर जागेत तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2016 साली या टर्मिनलला मान्यता मिळाली. त्यानंतर अनेक अडथळ्यांचा सामना करीत त्यांचे काम सुरू आहे.

केंद्र सरकारच्या निर्भया निधीअंतर्गत पुणे विभागातील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पुणे स्थानकात सध्या 61 कॅमेरे असून, आणखी 63 सीसीटीव्ही बसविण्यात येतील. त्यासाठी सर्व्हे केला जात आहे. उर्वरित एकूण 18 स्थानकांवर 539 सीसीटीव्ही बसविले जाणार असल्याची माहिती शर्मा यांनी दिली.

निधीची कमतरता नाही

जागेच्या ताब्यावरून काही लोकांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यामुळे येथील काम काही काळ रखडले होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा काम सुरू झाले आहे. स्थानक आवारातील इमारतीचे काम पूर्ण झाले असून रुळांचे काम सुरू आहे. या कामासाठी पुरेसा निधी आहे. त्यामुळे काम लवकर पूर्ण करू, असे शर्मा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Phaltan News: पाइपमध्‍ये अडकून तिघांचा मृत्‍यू; फलटण तालुक्यातील पाेटपाटातील घटना, तिघेही ओरिसातील पाेल्‍ट्री कामगार, काय घडलं!

Dharashiv News: उमरग्यात गॅससाठी लांब रांगा; बुकिंग केल्यानंतरही १५ दिवस प्रतीक्षा;सिलिंडर उशिरा मिळत असल्याने ग्राहक त्रस्त

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

SCROLL FOR NEXT