लोणी काळभोर, ता. १६ : थेऊर आणि माळीमळा परिसरात विनापरवाना सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारूविक्रीच्या अड्ड्यांवर लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई केली व दोघांना ताब्यात घेतले. यावेळी दारू सेवनासाठी आलेल्या दोघांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण साडेचार लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.
थेऊर पोलिस चौकीच्या हद्दीतील कुंजीरवस्ती येथे १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी तुळसाबाई दगडू राखपसरे (वय ६०) ही महिला विनापरवाना गावठी हातभट्टी दारू विक्री करताना आढळून आली. पोलिसांनी तिच्याकडून सुमारे अडीच लिटर गावठी दारू जप्त केली.
त्यानंतर माळीमळा परिसरातील चिंतामणी मंगल कार्यालयासमोरील पत्र्याच्या शेडजवळ पोलिसांनी कारवाई केली. तेथे संजय दादू राखपसरे (वय ५५) हा गावठी दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून दोन लिटर दारू जप्त करण्यात आली. यावेळी दारू सेवनासाठी आलेले रमेश जाधव (वय ५५) आणि पांडुरंग दुनघव (वय ७५) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.