gun 
पुणे

पिस्तूल घेऊन तिघे फिरत होते, मग पोलिसांची झाली एंट्री... 

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्‍यातील कदमवाकवस्ती येथील एकाचा खून करण्याच्या उद्देशाने एक गावठी पिस्तूल, आठ जिवंत काडतुसे व एक रिकामी मॅगझीन घेऊन फिरणाऱ्या लोणी स्टेशन येथील तीन अट्टल गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांनी रविवारी (ता. 10) मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी फिरोज महंमद शेख (वय 25), आनंद महादेव चव्हाण (वय 23) व नीलेश नागेश जेटीथोर (वय 22, रा. तिघेही, कदमवाकवस्ती) यांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.

फिरोज शेख हा अट्टल गुन्हेगार असून, तो त्याच्या दोन मित्रांसह कंबरेला पिस्तूल लावून लोणी स्टेशन परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांना एका खबऱ्याकडुन मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी ननवरे, पोलिस शिपाई परशराम सांगळे व लोकेश राऊत यांनी लोणी स्टेशन परिसरात सापळा रचला होता. यात फिरोज शेख, आनंद चव्हाण व नीलेश जेटीथोर हे तीन आरोपी अलगद सापडले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

या तीन आरोपींची झडती घेतली असता, पोलिसांना गावठी पिस्तूल, आठ जिवंत काडतुसे मिळून आली. दरम्यान, पोलिसांनी अटक केलेले तीनही आरोपी अट्टल गुन्हेगार असून, एकाचा खून करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT