loni kalbhor police busted tadipar gangster shashikant chavan action pune crime Sakal
पुणे

Pune Crime : गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी तडीपार गुंडाची पोलिसांकडून कुंजीरवाडी परिसरात धिंड

कोयता हातात बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक करून गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी त्याच्याच गावात म्हणजेच कुंजीरवाडी (ता. हवेली) परिसरात त्याची धिंड काढली.

सकाळ वृत्तसेवा

- सुवर्णा कांचन

उरुळी कांचन : कोयता हातात बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक करून गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी त्याच्याच गावात म्हणजेच कुंजीरवाडी (ता. हवेली) परिसरात त्याची धिंड काढली.

योगेश शांताराम लोंढे (वय ३२, धंदा मजुरी, रा. जुन्या कॅनलजवळ, माळवाडी, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि.पुणे) असे तडीपार गुंडाचे नाव आहे. लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी म्हातोबाची येथे वडाच्या झाडाखाली हातात लोंखडी कोयता घेऊन एक इसम थांबल्याची माहिती बुधवारी (ता. ६) सायंकाळी ७ च्या सुमारास खबऱ्या मार्फत मिळाली.

त्या ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे व पोलीस कर्मचारी पोचले असता त्या ठिकाणी उजव्या हातात लोंखडी कोयता घेऊन एक इसम थांबलेला आढळून आला. पोलिसांना पाहून तो पळ काढू लागला. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असणारा १०० रु किंमतीचा लोखंडी कोयता जप्त करण्यात आला.

त्याच्याविरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदशनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस हवालदार सतिश सायकर, पोलीस अंमलदार योगेश पाटील, निखील पवार, प्रशांत सुतार, सागर कदम, बाजीराव वीर, चक्रधर शिरगीरे यांच्या पथकाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! विमानतळावरून १५ नवीन विमानांची उड्डाणे; कुठे आणि कधीपासून? जाणून घ्या...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

SCROLL FOR NEXT