केसनंद, ता. १३ : अनेक वर्षांपासून रखडलेला लोणीकंद- बकोरी (ता. हवेली) शिवरस्ता प्रशासनाच्या पुढाकाराने अखेर खुला करण्यात आला. अतिरिक्त तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या आदेशानुसार रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले असून, यामुळे ३२५ हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न सुटला आहे.
या रस्त्याची १९ सप्टेंबर २०२५ रोजी मोजणी करून २ एप्रिल २०२६ रोजी हद्द निश्चिती केली होती. त्यानंतर मंडळ अधिकारी संदीप झिंगाडे व ग्राममहसूल अधिकारी संजय गारकर यांनी शेतकऱ्यांशी समन्वय साधत ही कार्यवाही पूर्ण केली. सुमारे दोन किलोमीटर लांबीचा हा मार्ग मोकळा झाल्याने १०० हून अधिक शेतकऱ्यांना शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मोठी मदत होणार आहे.
हा रस्ता भविष्यात रिंग रोडला जोडला जाणार असल्याने या भागाच्या विकासाला गती मिळणार आहे. या मोहिमेसाठी दत्तात्रेय वारघडे यांचे सहकार्य लाभले. रस्ता सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष संजय कंद, राहुल शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी मनीषा गवारी आदी उपस्थित होते.
05551
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.