पुणे

लोणी काळभोरमध्ये मटका अड्ड्यावर छापा

CD

लोणी काळभोर, ता. १७ : येथील एमआयटी रस्त्यावरील डी. के. वाईन्सच्या बाजूला सुरू असलेल्या कल्याण मटका अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट-६ ने छापा टाकून एकाला ताब्यात घेतले. या कारवाईत १२ हजार ८५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तिघांविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. देवेंद्र राजेंद्र खरात (वय २१, रा. घोरपडे वस्ती, लोणी काळभोर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, सुरज शुक्ला व रोहन शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखा युनिट-६ चे पथक मंगळवारी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना सायंकाळी साडेसातच्या सुमारास एमआयटी रस्त्यावर मटका सुरू असल्याची माहिती मिळाली. रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता तिघे पसार झाले, मात्र मटक्याच्या चिठ्ठ्या लिहिणाऱ्या देवेंद्र खरात याला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून १ हजार ८५० रुपये रोख, जुगाराचे साहित्य आणि मोबाईल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिस हवालदार श्रीकांत तुकाराम पांडुळे यांनी फिर्याद दिली आहे.
खरात हा सुरज शुक्ला व रोहन शुक्ला यांच्या सांगण्यावरून मटका घेत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस हवालदार राणी खामकर पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

Latest Marathi News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

SCROLL FOR NEXT