विधानभवन - निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सोमवारी बैठक घेऊन सूचना दिल्या. 
पुणे

मोठ्या आर्थिक व्यवहारांवर नजर - डॉ. दीपक म्हैसेकर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - विधानसभा निवडणुकीत मोठ्या रकमेच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर म्हैसेकर यांनी पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि निवडणुकीशी निगडित अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, मितेश घट्टे, संजयसिंह चव्हाण व प्रताप जाधव उपस्थित होते.

निवडणुकीच्या काळात मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याची आवश्‍यक आहे. त्यासाठी बॅंक अधिकाऱ्यांची मदत घ्यावी. रकमेची बेकायदा वाहतूक होऊ नये, यासाठी वाहनांची तपासणी करावी. यात बेकायदा रक्कम आढळल्यास काय कारवाई करावी, याबाबतच्या सूचना भरारी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना द्याव्यात. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण द्यावे. बेकायदा रक्कम आढळल्यास त्याची माहिती प्राप्तिकर विभागास द्यावी, अशा सूचना म्हैसेकर यांनी केल्या.

टपाली मतदान प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी नियोजन करा, असे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘‘दिव्यांग मतदारांसाठी आवश्‍यक सुविधा द्या. निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करा, तसेच निवडणूक आयोगाला आवश्‍यक असणारी माहिती वेळेत आणि अचूक सादर करा.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: आता पालकांना मोबाईलवर दिसणार शाळेची बस; महाराष्ट्रात नवे नियम लागू, नियम न पाळल्यास परमिट रद्द होणार

FDA Crackdown: एफडीए कारवाईवर उच्च न्यायालयाची झापड; पंचतारांकित हॉटेलला दिलासा, परवाना निलंबन पुनर्विचाराचा आदेश

Gangapur Water Supply: नऊ वर्षांनंतर गंगापूरचे जलशुद्धीकरण केंद्र सुरू; वाढत्या लोकसंख्येसाठी ८.५ एमएलडी नवीन पाणीपुरवठा योजनेची तयारी

मुलीच्या प्रेमविवाहाचा राग; तरुणाला बेदम मारहाण, जळत्या चितेवर फेकून दिलं...

Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक कुटुंबासाठी स्वतःची स्वप्नं ठेवतात बाजूला; पण नशीब त्यांना उशिरा का होईना देतं मोठं फळ

SCROLL FOR NEXT