सुट्या मसाल्यांवरील बंदी अन्यायकारक
भाजपच्या व्यापारी आघाडीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
अहिल्यानगर, ता. २५ ः अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सुटे मसाले विक्रीस बंदी घातली आहे. हा निर्णय व्यापारी वर्गासाठी तसेच घरगुती उद्योग करून स्वयंरोजगार मिळवणाऱ्या महिलांसाठी अन्यायकारक आहे. येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांमध्ये या निर्णयामुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम होईल. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने सुटे मसाले विक्रीवरील बंदीचा निर्णय त्वरित स्थगित करावा, या मागणीचे निवेदन नगर शहर भाजपच्या व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेश गुगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नुकतेच सर्व प्रकारचे अख्खा व दळलेला सुटा मसाला विक्रीस बंदी घातली आहे. हा निर्णय व्यापारी वर्गावर अन्यायकारक असून, संभाव्य दुष्काळी परिस्थितीमुळे व्यापारी वर्ग आधीच संकटात सापडला आहे. मसाला उत्पादन क्षेत्रात स्थानिक महिला वर्गाला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे. सरकार एकीकडे स्वयंरोजगार निर्मितीला प्रोत्साहन देत आहे. या निर्णयामुळे व्होकल फॉर लोकल या महत्त्वाकांक्षी प्रकल्पालाही खीळ बसेल. तसेच या निर्णयाची झळ मशिनरी उद्योगाला देखील बसणार आहे. ग्रामीण भागातील आर्थिक कणा असलेल्या आठवडे बाजारात शेकडो बेरोजगार युवक सुटे मसाले विक्रीची दुकाने लावतात. बऱ्याच महिला बचतगटांच्या माध्यमातून या व्यवसायात आहेत. ज्यांनी बचतगटाच्या माध्यमातून कर्ज काढून व्यवसाय सुरू केला, त्यांनी आपले कर्ज हप्ते कसे भरायचे, अशा अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे या आदेशाला तूर्तास स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.