44crime_logo_525_1.jpg
44crime_logo_525_1.jpg 
पुणे

कोयत्याचा धाक दाखवून भरदिवसा पावणेपाच लाखांची लूट

सकाळवृत्तसेवा

बिबवेवाडी(पुणे) : दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी एकाला कोयत्याचा धाक दाखवून पावणेपाच लाख रुपयांची कॅश लुबाडून नेली. मार्केटयार्ड परिसरात मंगळवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

गंगाधाम चौकातील कोंढवा रस्त्यावर पटेल पेट्रोल पंप आहे. तेथे दररोज जमा झालेली रक्‍कम स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मार्केटयार्ड शाखेत जमा केली जाते. नेहमीप्रमाणे दुपारी तेथील एक कर्मचारी ऍक्‍टिव्हा दुचाकीवर बॅंकेत रक्‍कम भरण्यासाठी जात होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी कर्मचाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला. त्यावर दुचाकी थांबविल्यानंतर एका चोरट्याने कर्मचाऱ्यास कोयत्याचा धाक दाखविला. त्यावर कर्मचाऱ्याने आरडाओरडा केला. परंतु रक्‍कम लुटून चोरटे मार्केटयार्डच्या
दिशेने पसार झाले.

बॅगेत चार लाख 74 हजार 280 इतकी रक्‍कम होती. चोरट्यांनी जर्कीन घातलेली होती. या घटनेनंतर परिमंडळ पाचचे सहायक पोलिस आयुक्‍त मिलिंद पाटील आणि मार्केट यार्डचे पोलिस निरीक्षक दुर्योधन पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. याप्रकरणी पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक अहमद हुसेन शेख (वय 64, रा. कोंढवा) यांनी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT