Looting of tourists in parking lot of Katraj Zoo 
पुणे

कात्रज प्राणीसंग्रहलायाच्या पार्किंगमध्ये पर्यटकांची लूट

वाहनचालकांकडून तिप्पट वसुली; पर्यटकांना अधिकचा अर्थिक भुर्दंड

अशोक गव्हाणे

कात्रज - राजीव गांधी प्राणीसंग्रहलायाच्या पार्किंगमध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणांत लूट होत आहे. राज्यभरातून प्राणी पाहणयासाठी पर्यटक येत असताना ठेकेदाराच्या दादागिरीला सामोरे जावे लागत आहे. चारचाकीसाठी तासाला दहा रुपये शुल्क असताना तब्बल ३० रुपये वसूल केले जात आहेत. तर दुचाकीला २ रुपयांऐवजी १० रुपये शुल्क आकारले जाते. या ठेकेदारांविरोधात महापालिकेकडे तक्रार करुनही किरकोळ दंडात्मक कारवाईशिवाय काहीही करण्यात आलेले नाही. त्यामुळे या ठेकेदाराला पैसे उकळण्यासाठी मोकळे रान मिळाले आहे.

कोरोनानंतर मार्चमध्ये प्राणी संग्रहालय चालू झाल्यापासून साडेसात लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. या माध्यमांतून महापालिकेला अडीच कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. वाघ, सिंह, हत्ती, रानमांजर, वाघाटी, शेकरु, अस्वल, गवा यांच्यासह वेगवेगळ्या प्रजातीचे साप आणि अन्य वन्यजीव प्राणी संग्रहालयात पाहायला मिळतात. यासाठी राज्यासह देश-परदेशातून पर्यटक येतात. या पर्यटकांसाठी महापालिकेने राजीव गांधी वाहनतळाची सोय केलेली आहे. हे वाहनतळ खाजगी ठेकेदारांकडून चालविले जात आहे. महापालिकेने ठेकेदारांसोबत केलेल्या करारामध्ये दुचाकीसाठी तासाला दोन रुपये आणि चारचाकीसाठी दहा रुपये दर निश्चित केलेला आहे. एवढेच पैसे ठेकेदाराने घेणे बंधनकारक आहे. परंतु, ठेकेदाराच्या कामावर महापालिका अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने लुटमार सुरु असल्याचे दिसून येते.

अशी होते लूटमार

प्राणीसंग्रहलालयात आलेल्या पर्यटकांकडून वाहनांसाठी शुल्क म्हणून तिप्पट वसुली करण्यात येते. त्यामुळे पर्यटकांना अधिकचा अर्थिक भुर्दंड होतो. दुचाकी पार्किंग केल्यास पहिल्या तासाप्रमाणे २ रुपये आकारणी करणे गरजेचे असताना थेट पाच तासाचे म्हणून १० रुपये आकारले जातात. तर, चारचाकीसाठी एक तासाच्या नंतर पाच-दहा मिनीट झाले तरी जास्तीचे ३० रुपये आकारले जात असल्याचे समोर आले आहे. चारचाकी वाहनांसाठी वाहनचालकांना कोणत्याही प्रकारची पावती देण्यात येत नाही. एखाद्या पर्यटकांने ती आवर्जून मागीतलीच तर तिच्यावर शुल्काची रक्कम न टाकता तारीख आणि वेळ नमूद असलेली पावती दिली जाते.

ना दरपत्रक ना तक्रार क्रमांक

महापालिकेसोबत केलेल्या करारात पार्किंगच्या ठिकाणी मोठ्या अक्षरात दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. तसेच, तक्रारीसाठी क्रमांक लिहणे आवश्यक आहे. पंरतु पार्किंगच्या जागेत कुठेही दरपत्रक किंवा तक्रार क्रमांक दिलेला नाही. नागरिकांना शुल्कांबाबत विचारणा करताच ठेकेदाराच्या माणसांकडून दादागिरी करत उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे कुटुंबासमवेत आलेले पर्यटक नाईलाजास्तव निमूटपणे निघून जातात, असा वारंवार अनुभव येत आहे.

पार्किंगच्या ठेकेदाराने नियमांनुसार शुल्क आकारणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीत या घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यात येईल. सर्व बाबी तपासून ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात येईल.

- कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

मी प्राणी संग्रहलायात गेलो असता माझे प्राणी संग्रहालयाचे तिकीट पाहून सव्वा तासासाठी ६० रुपये शुल्क आकारण्यात आले. कोणतीही दुसरी स्वतंत्र पावती दिली नाही. याबाबत पावतीची विचारणा केली असता ती दिली नाही. सोबत लहान मुलगी असल्याने मी पैसे देऊन बाहेर पडलो. जास्त हुज्जत घातली नाही.

- सौमित्र गायकवाड, पर्यटक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT