ramaragahv 
पुणे

पुण्यात लॉकडाऊनमधील निवाराकेंद्रात फुलली प्रेमकहाणी; वाचा सविस्तर बातमी !

सकाळवृत्तसेवा

कोथरूड : दोघेही रेल्वेस्टेशनवर राहून आपली उपजीविका भागवत होते. लॉकडाउनने त्यांना कोथरूडच्या शाळेत एकत्र आणले. जवळीक वाढली अन्‌ आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

छत्रपती संभाजी विद्यालय बेघर निवारा केंद्रात 35 पुरुष आणि 6 स्त्रिया असे 41 जणांना ठेवण्यात आले आहे. एकमेकांचा फारसा परिचय नसलेले विविध गावातील, राज्यातील लोक लॉकडाउनमुळे शाळेच्या छताखाली एकत्र रहायला आले. 
या सहवासातूनच रामाराघव गजबहार (वय 36, मूळ रा. परभणी) व सुरम्मा (वय 25, मूळ रा. हैदराबाद) यांच्यातील जवळीक वाढली. आता त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे.

चार दिवसापूर्वी बेघर केंद्रातील नागरिकांना साक्षी ठेवत या दोघांनी कुंकू लावत लग्नाच्या आणाभाका घेतल्या. त्यांच्या या प्रेमकहाणीने इतरांना चर्चेचा खुराक मिळाला आहे. सतत एकाच खोलीत राहून हैराण झालेल्यांच्या अनेक कथा, प्रसंग कानावर पडत असताना या प्रेमकहाणी बद्दल ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

मूळचे परभणीचे असलेले रामाराघव हे पुण्यात सात-आठ वर्षापासून बिगारी काम व लग्नामध्ये जेवण वाढण्याचे काम करतात. पुणे रेल्वे स्टेशनला राहतात. रामाराघव यांना त्यांची पत्नी सोडून गेलेली आहे. बायको नांदायला येत नसल्याने एकटेच राहतात. पत्नीपासून घटस्फोट झालेला नाही. पत्नी गावाकडे स्वतःच्या आई-वडिलांकडे राहून शेती करते. पहिली मुलगी बारा, तर दुसरी व तिसरी अनुक्रमे दहा व आठ वर्षाची आहे. 

सुरम्माने सुद्धा सतत मारहाण करत असलेल्या आपल्या पतीला सोडून दिलेले आहे. दोघांनी आपला गतकाळातील इतिहास एकमेकांना सांगितला आहे. रामाराघव म्हणाले की, "आम्ही स्टेशनला राहतो होतो. लोक तेथे जेवण आणून द्यायचे पण लॉकडाउन वाढल्याने आम्हाला येथे आणले.

मी तिला पुणे स्टेशनला पाहात होतो. पण त्यावेळी कधी बोलणे झाले नव्हते. लॉकडाउनमुळे एकत्र आलो. लॉकडाउन संपल्यावर आम्ही लग्न करून एकत्र राहणार आहोत. माझे बारावी शिक्षण झाले आहे. मी नोकरी करून संसार करू इच्छितो.' 

सुरम्मा म्हणाली, "माझे मन जाणून घेणारा कोणीतरी मला भेटला आहे. मी त्याच्या प्रेमात पडले. आता याच्याबरोबर संसार करायचा आहे.' हे लग्न कायदेशीर असणार नाही वगैरे मुद्दे उपस्थित होतीलही पण सध्या तरी ही जोडी मनाने एकत्र आली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SURYAVANSHI: ११ चेंडूत अर्धशतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी फायनलमध्ये 'असा' झाला आऊट; नक्की काय घडलं?

ChatGPT मध्ये मोठं अपडेट! आता वेळेवर मिळणार सगळे अलर्ट; जाणून घ्या कसं काम करतंय हे फीचर? आहे तुमच्या फायद्याचं

नॅशनल हायवे अन् एक्सप्रेस वेवर हवामानानुसार बदलणार वेग मर्यादा; उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान

BEST Bus: 'नीट' परीक्षेसाठी 'बेस्ट'ची विशेष सेवा; २४ मार्गांवर ६० अतिरिक्त बसेस, दिवसभरात १८० फेऱ्यांचे नियोजन

Akole Leopard Attack: लेक किंचाळली अन् वडील धावले! बिबट्याच्या तावडीतून ४ वर्षीय अवनीची सुटका; अकोल्यातील थरारक घटना..

SCROLL FOR NEXT