rice seed 
पुणे

लावलं भात, उगवली "खेड' 

गोरख माझीरे

कोळवण (पुणे) : मुळशी तालुक्‍यातील अनेक भात उत्पादक शेतकऱ्यांची "कृषिधन' या बियाणे कंपनीकडून फसवणूक झाली आहे. दर्जेदार बियाण्यांच्या नावावर कमी दर्जाचे भेसळयुक्त बियाणे मिळाले आहे. त्यातून पिकात लोंब टाकण्याची, गर्भ पकडण्याची व उंचीची तफावत जाणवत आहे. पिकात मोठ्या प्रमाणात "खेड' (कमी दर्जाचे पीक) झालेली आहे. 
करमोळी (ता. मुळशी) येथील पीडित शेतकरी संतोष केदारी यांनी गावातीलच दुकानातून कृषिधन कंपनीचे इंद्रायणी जातीचे भाताचे बी घेतले. त्याची योग्य वेळी अडीच एकरांत पेरणी केली. मात्र, पिकाच्या वाढीत कमालीचा फरक त्यांना जाणवला. त्यामुळे त्यांनी जाणकारांकडून माहिती घेतली. त्यावर या बियाण्यांत "खेड' असल्याचे समजले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, लागवडीचा पैसाही निघणार नसल्याचे शेतकरी सांगतात. 
पीडित शेतकरी संतोष केदारी यांचे संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. त्यांच्याकडे आठ दुभती जनावरे आहेत. पावसाळ्यात होणाऱ्या प्रचंड पावसामध्ये सर्व क्षेत्रात फक्त भात पीक ते घेतात. दरवर्षी अडीच एकरात सुमारे 70-80 पोती भात पीक काढून ते अंदाजे दोन लाख रुपये उत्पन्न मिळवितात. परंतु, या फसवणुकीमुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा व दुभत्या जनावरांच्या चाऱ्यासाठीचा वर्षभराचा प्रश्‍नही उभा राहिला आहे. 
केदारी यांच्यासारखीच परिस्थिती विठ्ठल नामदेव जाधव, सदाशिव दरोडे आणि कोळवण खोऱ्यातील अनेक शेतकऱ्यांची झाली आहे. कृषिधन कंपनीने बोगस बियाणे दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या कंपनीवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे 
याबाबत कंपनीच्या प्रतिनिधींशी बोलल्यावर ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी खैरनार, पंचायत समितीचे कृषी अधिकारी व कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी येथील पिकाची पाहणी केली आहे. त्याचा अहवाल तयार करून सहसंचालक व कृषी विकास अधिकारी यांच्याकडे पाठवणार आहे. त्यानुसार कृषी आयुक्तालय कारवाई करेल, असे कृषी अधिकारी दत्तात्रेय भालेराव यांनी सांगितले. 

आठवड्याभरापूर्वी कृषी विभागाने या बोगस बियाण्यांच्या पिकांची पाहणी केली. परंतु, अद्यापही त्याचा अहवाल तयार झालेला नाही. कंपनीचे वारंवार उंबरठे झिजविले, तरी त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. कृषी आयुक्तालयाने कंपनीवर कारवाई करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी. 
- संतोष केदारी, शेतकरी, करमोळी (ता. मुळशी) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT