पाषाण ः लॉयला स्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या लॉयला करंडक शालेय फुटबॉल स्पर्धेच्या चौदा वर्षांखालील गटात उंड्रीच्या बिशप्स को-एड स्कूल आणि द. कल्याणी स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यातील एक चुरशीचा क्षण.
----------------
बिशप्स, लॉयला, जे. एन. पेटिट प्रशालेची आगेकूच
लॉयला करंडक शालेय फुटबॉल
पुणे, ता. १३ ः लॉयला स्कूल आणि एक्स-लॉयला ॲल्युमनी नेटवर्क (इलान) आयोजित लॉयला करंडक शालेय फुटबॉल स्पर्धेत उंड्रीच्या बिशप्स को-एड स्कूल, लॉयला स्कूल आणि जे. एन. पेटिट टेक्निकल स्कूलने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नमवून आपली आगेकूच कायम राखली आहे.
पाषाण येथील लॉयला स्कूलच्या मैदानावर झालेल्या या लढतीत चौदा वर्षांखालील गटात लॉयला स्कूलने जे. एन. पेटिट टेक्निकल स्कूलचा ६-१ अशा गोलने पराभव केला. त्यात महत्त्वाचा वाटा शॉन आंग्रे (१६ व १८ वे मिनीट) व निवेद नायरने (३६ व ४१ वे मिनीट) प्रत्येकी दोन तर आरव इंगळे (८ वे मिनीट) व शार्दूल मनोहरने (४५ वे मिनीट) प्रत्येकी एक गोल केला. तर जे. एन. पेटिट टेक्निकल स्कूलकडून एकमेव गोल अगस्त्य बर्डेने सातव्या मिनिटास केला होता.
या गटातील दुसऱ्या सामन्यात उंड्रीच्या बिशप्स को-एड स्कूलने द. कल्याणी स्कूलचा ७-१ अशा गोलने पराभव केला. त्यात प्रमुख वाटा कौस्तुभ पंचारेने केलेल्या (३५, ४० व ४५ वे मिनीट) तीन गोलांचा होता. त्याला जेडन डेव्हिडने (३५ व ४७ वे मिनीट) दोन तर सालिफ बेग (८ वे मिनीट) आणि श्रेयानसिंगने (३४ वे मिनीट) प्रत्येकी एक गोल केला. तर द. कल्याणी स्कूलकडून एकमेव गोल अक्षज अगरवालने (४२ वे मिनीट) केला.
तिसऱ्या सामन्यात रयान पंजाबीचे दोन गोल (११ व ४९ वे मिनीट) आणि अन्विक लोबोने केलेल्या (४७ वे मिनीट) एक गोलच्या जोरावर सेंट व्हिन्सेंट स्कूलने सेंट झेवियर्स स्कूलवर ३-० असा विजय मिळविला.
सोळा वर्षांखालील गटात विद्याभवन स्कूलने ब्ल्यू रिज पब्लिक स्कूलवर मात केली. यावेळी जोनाथन साळवेने ३८ व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. ब्ल्यू रिज पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी सुरेख चाली रचल्या, परंतु ते गोल करण्यात मात्र अपयशी ठरले.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.