एलअँडटी फायनान्सची सोनतारण कर्ज मोहीम
पुणे, ता. २१ ः एलअँडटी फायनान्स लि. (एलटीएफ) कंपनीने सुवर्ण कर्जाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आपला ब्रँड अँबेसेडर जसप्रीत बुमराह यांच्यासह ‘कोई भी सपना होल्ड मत करो, एलअँडटी फायनान्स गोल्ड लोन करो’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेबाबत कंपनीचे संचालक राजू दोडती म्हणाले, ‘‘आमचा सुवर्णकर्ज व्यवसाय आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत वार्षिक १८२ टक्क्यांनी वाढ नोंदवत ३,८२९ कोटी रूपयांवर पोहोचला आहे, जो आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत १,३६० कोटी रूपये होता. याला आमच्या ३४३ शाखांचे पाठबळ लाभले आहे. चालू आर्थिक वर्षात एकूण शाखांची संख्या ८०० हून अधिक करण्याचा आमचा मानस आहे. ही मोहीम आम्हाला नव्या बाजारपेठांमध्ये पोहोचण्यास, ग्राहकांसोबत नाते अधिक दृढ करण्यास आणि येत्या वर्षांत सातत्याने उच्चांकी वाढ नोंदवण्यास मदत करेल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.