पुणे

एल अँड टीच्या सीएसआर निधीमुळे भुकूमच्या शाळेचा कायापालट

अधिकाऱ्यांची भेट घेवून शाळा इमारतीच्या रंगरंगोटीबाबतचे आवाहन केले.

बंडू दातीर

बावधन : एल अॅड टी कंपनीने आपल्या सीएसआर निधीतून भुकूम येथील जिल्हा परिषद शाळेची रंगरंगोटी आणि सभागृहाचे शेड बांधले आहे. कंपनीच्या सहकार्यामुळे शाळेच्या इमारतीचा कायापालट झाला असून येथील भिंतीही आता बोलक्या झाल्या आहेत.

शाळेतील उपशिक्षिका विनिता बारवे यांनी ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनीधी, शालेय शिक्षण समितीचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने एल अॅंड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेवून शाळा इमारतीच्या रंगरंगोटीबाबतचे आवाहन केले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी वर्गखोल्यांसह संपूर्ण इमारतीची रंगरंगोटी केली. इमारतीच्या टेरेसवर शेड बांधून सभागृहाची सुविधा उपलब्ध करून दिली. भिंतीवर वेगवेगळी चित्रे काढली. यामुळे संपूर्ण शाळेचे रूपडेच बदलले. तसेच रंगीत चिंत्रांमुळे भिंतीही बोलक्या झाल्या.

या इमारतीचा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी कंपनीचे हेड ऑफ वेस्ट व्हिजन आत्माराम मगर, उपसभापती विजय केदारी, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, गटशिक्षणाधिकारी माणिक बांगर, माजी सरपंच नामदेव माझिरे, सरपंच रेखा वाघ, उपसरपंच सचिन आंग्रे, मुख्याध्यापक बाळू लबडे, भारती खोपडे, विनिता बारवे, सुरेखा विश्वासराव, संगीता गव्हाणे, शिवाजी पवार, रोहिणी गवळी, प्रवीण हगवणे, अतुल पवार, शारदा ननावरे, विनोद ननावरे, विजय ननावरे, शुभांगी माझीरे, दिपाली माझीरे, पूजा मोडक, शिवाजी जाधव, अश्विनी ननावरे, ग्रामसेवक भागवत यादव, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली T20I मालिका; झिम्बाब्वेचा दुसर्‍या सामन्यात उडवला धुव्वा

संपूर्ण भाजप धर्मेंद्र प्रधानांच्या पाठिशी! शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?

विषय चांगला पण.. कसा आहे श्रेयस तळपदे अन् काजल अग्रवालचा 'द इंडिया स्टोरी'? वाचा रिव्ह्यू

Sharad Pawar on NEET Protest : नीट आंदोलनाच्या तोडग्यासाठी माझा सल्ला महत्त्वाचा ठरला, असा शरद पवारांचा दावा

Pune Student Protest Celebration : शिक्षणमंत्र्यांच्या कथित राजीनाम्याच्या दाव्यानंतर पुण्यात विद्यार्थ्यांचा जल्लोष; ‘मेलोडी’ वाटून साजरा केला आनंदोत्सव

SCROLL FOR NEXT