पुणे

अग्नितांडवात १५ मृत्युमुखी लखनौमधील दुर्घटना; सात जखमी

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
लखनौ, ता.२२ ः येथील अलिगंज भागातील तीन मजली इमारतीला आज दुपारी तीनच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत १५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आगीची तीव्रता एवढी होती की अनेकांनी दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या. या घटनेत किमान सात जण जखमी झाले आहे.
इमारतीमध्ये तळघर, तळ मजला आणि पहिल्या मजल्यावर पाळीव प्राण्यांचा दवाखाना आणि पाळीव प्राण्यांसाठीच्या वस्तूंचे दुकान होते. दुसऱ्या मजल्यावर लर्निंग स्पेस नावाचा कोचिंग क्लास आणि हेड हॉपर स्टुडिओ होता. तेथे थ्रीडी आर्ट प्रॉडक्शन आणि गेम ॲसेट आउटसोर्सिंगचे काम केले जात होते. प्राथमिक माहितीनुसार तळघरात बसविलेल्या एसी यंत्रणेत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी. मात्र आगीचे नेमके कारण कळालेले नाही. पाळीव प्राण्यांच्या दवाखान्यातील अनेक प्राण्यांचाही या आगीमुळे मृत्यू झाल्याचे समजते.
धुरापासून वाचण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी स्वतःला स्वच्छतागृहात कोंडून घेतले. काही विद्यार्थ्यांनी पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, खाली असलेल्या ग्रीलवर पडून तो गंभीर जखमी झाला. घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनुसार आठ ते नऊ मुलांनी उड्या मारून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना ‘केजीएमयू ट्रॉमा सेंटर’मध्ये दाखल करण्यात आले आहे.
आगीचा माहिती मिळताच हायड्रोलिक शिडीसह १४ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलिगडचा दौरा रद्द केला व त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाइकांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

वय वाढण्याआधीच मानेवर रेषा दिसू लागल्यात? या टेक लाइन्स घालवण्यासाठी जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितले ४ सोपे व्यायाम

SCROLL FOR NEXT