eclipse.jpg 
पुणे

संपुर्ण भारतात दिसणार खंडग्रास चंद्रग्रहण

सम्राट कदम

पुणे : भारतातून बुधवारी (ता.17) पहाटे दीड वाजता खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार एक वाजून 31 मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहण सुरू होईल. संपूर्ण देशात सुरवातीपासून शेवटपर्यंत हे ग्रहण दिसेल. केवळ अरुणाचल प्रदेशच्या अत्यंत दूरवरच्या ईशान्येकडच्या भागात ग्रहण सुटतांनाची स्थिती दिसू शकणार नाही. असे भूविज्ञान मंत्रालयाने कळविले आहे. 

पृथ्वीच्या छायेने चंद्र हळूहळू झाकला जाण्यास सुरुवात होईल. खंडग्रास चंद्रग्रहणाचा परमोच्च बिंदू 3 वाजून 1 मिनिटांनी असेल. या क्षणी चंद्राचा अर्ध्याहून अधिक भाग पृथ्वीच्या छायेने झाकलेला असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार 4 वाजून 30 मिनिटांनी हे ग्रहण सुटेल. 

ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, ईशान्य आशिया वगळता आशियाचा इतर भाग, उत्तर स्कँडेव्हिया वगळता युरोप आणि दक्षिण अमेरिकेच्या बहुतांश भागात ग्रहण दिसेल. ग्रहणाचा एकूण अवधी 2 तास 59 मिनिटे असेल. 

चंद्रग्रहण कसे होते 
अवकाशात भ्रमण करणाऱ्या सूर्य आणि चंद्र यांमध्ये पृथ्वी आली की पृथ्वीवर चंद्रग्रहण दिसते. या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. त्यामुळे जिथे रात्र आहे तिथे हे ग्रहण दिसते. खंडग्रास चंद्रग्रहणात पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्राचा अर्धाच भाग झाकला जातो. तर कंकणाकृती ग्रहणात चंद्राचा संपूर्ण भाग झाकला जातो. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs AFG 3rd T20I: अभिषेक शर्माचा विश्वविक्रम अन् भारताचा मालिका विजय! जसप्रीत, नितीशचे खतरनाक यॉर्कर Video

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

SCROLL FOR NEXT