पुणे

आलिशान कारमधून मांस वाहतूक

CD

आलिशान कारमधून मांस वाहतूक

विजापूर रोडवर पोलिसांचा सापळा, कारसह मांस जप्त, दोघांवर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २३ : विजापूर रोड परिसरातून आलिशान कारमधून मांसाची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. विजापूर नाका पोलिसांनी गोरक्षकांच्या माहितीवरून कारवाई करीत कार अडविली. कारमध्ये सुमारे ७०० ते ८०० किलो मांस आढळले असून यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२० जून रोजी एका कारमधून (एमएच ०३, एएम ०३४६) मांसाची वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यांनी विजापूर नाका पोलिसांना याबाबत माहिती दिली. विजापूर नाका पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली गोरक्षकांनी संबंधित वाहनाचा शोध घेतला. सोरेगाव परिसरात वाहन आढळल्यानंतर कार थांबविण्याचा प्रयत्न केला, पण कारचालक तसाच पळून जात होता. मात्र, पोलिसांनी सैफुल परिसरात कार थांबविली आणि दोघांना ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता, कारच्या मागील बाजूला जनावराचे मांस होते. पोलिसांनी वाहन जप्त करून चालक व त्याच्यासोबतच्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिस उपायुक्त प्रीतम यावलकर, हिंदवी सेनेचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांचे सहकार्य लाभले. कारवाईसाठी गोरक्षक लतेश हिरवे, प्रसाद झेंडगे, सुरज शिंदे, अक्षय बनसोडे आणि हिंदवी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची मदत झाली. पोलिसांनी संशयित दोघांना नोटीस देऊन सोडले असून पुढील तपास अधिकारी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Community Book Bank: ममदापुरात लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत बुक बँक सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाचे नवे दालन

SCROLL FOR NEXT