पुणे

''आंधळी''त भाजपचा वारु रोखला जाणार का?

CD

माणच्‍या राजकारणात ‘आंधळी’च केंद्रस्‍थानी

सभापतिपदामुळे गणात उमेदवारीसाठी ‘खुली’ चुरस; मराठा इच्छुकांना संधी मिळणार?

रूपेश कदम : सकाळ वृत्तसेवा

दहिवडी, ता. १६ : सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेला ‘आंधळी’ जिल्हा परिषद गट याही वेळी राजकीय धुरिणांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नेहमीप्रमाणे आंधळी गट याहीवेळी लक्षवेधी ठरणार आहे, तर मलवडी व आंधळी हे दोन्ही गणही खुले आहेत. माण पंचायत समितीचे सभापतिपद खुले असल्याने येथील विजेत्यांना सभापतिपदाची संधी मिळू शकते. त्यामुळे गणात उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे.
माणच्या राजकारणात संवेदनशील तथा व बंडखोर प्रवृत्तीचा गट म्हणून पूर्वाश्रमीचा महिमानगड व आताच्या आंधळी गटाची ओळख आहे. किंगमेकर (कै.) सदाशिवराव पोळ यांचा माण तालुक्यावर एकछत्री अंमल असताना त्यांच्या पत्नी (कै.) कमल पोळ यांचा पराभव याच गटाने केला होता, तर २००७ मध्ये तत्कालीन नवख्या जयकुमार गोरे यांना सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आणून येथीलच मतदारांनी जिल्हा परिषद सदस्य केले होते. जयकुमार गोरे व शेखर गोरे यांच्या राजकीय वाटचालीत महत्त्वपूर्ण भूमिका सुद्धा याच गटाने बजावली आहे. जयकुमार व शेखर या गोरे बंधूंच्या राजकारणातील उदयानंतर आंधळी गटावर दोघांचेच वर्चस्व राहिले आहे.
गटाचे आरक्षण व आजपर्यंतचा इतिहास बघता उमेदवार कोण असणार, याबद्दल चर्चा सुरू आहेत. मात्र, शेखर गोरे यांनी मागील काही दिवसांपूर्वी आंधळी येथे झालेल्या कार्यक्रमात आपल्या पत्नीची म्हणजेच सोनल गोरे यांची भाजपकडून उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, या उमेदवारी विरोधात जयकुमार गोरे गटातून कुजबूज सुरू आहे. भाजपमध्ये पक्षाचा निर्णय अंतिम असून, वैयक्तिक कोणीही उमेदवारी जाहीर करू शकत नाही, अशा चर्चेने जोर धरला आहे. भाजपकडून आंधळीचे सरपंच दादासाहेब काळे हे पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी काळे यांच्यासाठी इच्छुक आहेत, तसेच आरक्षण सर्वसाधारण असल्याने व हा गट मराठा बहुल असल्याने मराठा उमेदवाराला संधी मिळावी, अशी मागणी पुढे येत आहे. यामध्‍ये भाजपचे दहिवडी मंडल अध्यक्ष गणेश सत्रे यांच्या पत्नी मीनाक्षी यांचे नाव आघाडीवर आहे, तर भाजपच्या अनाकलनीय खेळींमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकनिष्ठ कार्यकर्ते मलवडीचे दादा सुरेश जगदाळे यांच्या पत्नी कौशल्या यांनाही संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. विरोधकांच्यात उमेदवारीबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे.

राष्‍ट्रवादी पुन्‍हा एकत्रित
राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्रितपणे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी इतर सर्वच छोट्या पक्षांना सोबत घेण्याची मानसिकता केल्याची दिसत आहे. सध्या विरोधकांकडून टाकेवाडीचे युवा नेते दादा यशवंत दडस यांच्या पत्नी योगिता यांचे नाव आघाडीवर आहे. मलवडीच्या सरपंच दीपाली जगदाळे यांचेही नाव चर्चेत आहे.

मलवडी गणांत उमेदवारीची उत्‍सुकता
मलवडी व आंधळी गणात उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. या दोन्ही गणांतून शेखर गोरे आपल्या विचारांच्या कार्यकर्त्यांना मैदानात उतरवणार का जयकुमार गोरे यांचे उमेदवार मैदानात असणार याची उत्सुकता आहे. मलवडी गणात सध्या भाजपकडून परकंदीचे बाळासाहेब कदम, शिरवलीचे योगेश घाडगे, मलवडीचे दादा सुरेश जगदाळे, सचिन मगर व दादासाहेब शामराव जगदाळे, टाकेवाडीचे जालिंदर दडस तर शेखर गोरे गटातून कुळकजाईचे रमेश शिंदे व अमर कुलकर्णी, मलवडीचे नीलेश मगर, परकंदीचे महादेव इंगळे यांची नावे चर्चेत आहेत, तर विरोधकांकडून मलवडी गणातून मलवडीचे गणेश जगदाळे, रफिक मुलाणी, टाकेवाडीचे दादा यशवंत दडस, शिरवलीचे तुकाराम जगदाळे, शिंदीचे किरण कदम, भांडवलीचे सुनील सूर्यवंशी यांची नावे चर्चेत आहेत.

...........................

आंधळी गणात चुरस
आंधळी गणातून आंधळीचे अर्जुन काळे, दादासाहेब काळे,
सुरुपखानवाडीचे गणेश सत्रे, कासारवाडीचे किसन सस्ते यांची, तर शेखर गोरे गटाकडून राजू जाधव ही नावे चर्चेत आहेत. विरोधकांकडून पिंगळीचे श्रीकांत जगदाळे, दिवडीचे सुनील जाधव, आंधळीचे दादा पोपट काळे, सुरुपखानवाडीचे कॅप्टन बंडू कोकरे, पांढरवाडीचे लक्ष्मण सूर्यवंशी आदी नावांची चर्चा होत आहे.

..................

हेही ठरणार महत्त्‍वाचे
जयकुमार गोरे व शेखर गोरे यांच्यात समेट होऊन सोनल गोरे यांची उमेदवारी अंतिम होणार!
दोन्ही राष्ट्रवादीत तडजोड होणार!
काँग्रेस, शिवसेना (एकनाथ शिंदे), शिवसेना (उद्धव ठाकरे) व इतर पक्षांची ताकद नगण्य, मात्र साथ कोणाला?
गट-तटाच्या राजकारणाचा राष्ट्रवादीला फटका!
सर्वसाधारण आरक्षण असताना गटात व‌ गणात उमेदवारीत मराठा समाजाला प्राधान्य मिळणार का?
विरोधी कार्यकर्त्यांकडून अनुराधा देशमुख वा अभयसिंह जगताप यांच्या घरातील उमेदवारीची मागणी
............................................
छायाचित्र
जयकुमार गोरे
प्रभाकर देशमुख
शेखर गोरे
अनिल देसाई
अभयसिंह जगताप
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : मुंबईच्या निकालात ट्विस्ट; उरलेल्या १० जागांवरुन ठरणार पुढचं गणित, काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत?

BMC Election: महायुतीचा महास्फोट! देवेंद्र फडणवीसांनी २५ वर्षांचा भाजपचा वनवास कसा संपवला? ठाकरे बंधुंना बाजुला कसं सारलं? वाचा...

BABAR AZAM VIDEO : बाबर आझमचा Live Match मध्ये स्टीव्ह स्मिथने कचरा केला? सारे हसू लागले अन् पाकिस्तानी फलंदाज संतापला

मुंबईचा कौल, सत्तासमीकरणांवर परिणाम... BMC निकालांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार?

Municipal Eection Results 2026 : अकोल्यात भाजपला १० जागांचा फटका, संपूर्ण ८० जागांचा निकाल जाहीर; पण महापालिकेवर कुणाची सत्ता? वाचा विजयी उमेदवारांची यादी...

SCROLL FOR NEXT