पुणे

‘माणुसकी जिवंत आहे’ पुस्तकाचे प्रकाशन

CD

राजगुरूनगर, ता. २७ : हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते कैलास दुधाळे लिखित ‘माणुसकी जिवंत आहे’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (ता. २३) झाले. यावेळी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘कृतज्ञता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस होते. प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री पुरस्कारप्राप्त गिरीश प्रभुणे, डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर, रवी बोडके, आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे उपस्थित होते.
या सोहळ्यात बेवारस, मनोरुग्ण आणि अनाथांची सेवा करणाऱ्या दिलीप गुंजाळ, दादाराव गायकवाड, प्रीती वैद्य, कांचन कदम, अनिल कुडिया, डॉ. नंदकुमार पालवे, डॉ. अभिजीत सोनवणे, माउली सावंत, एम. ए. हुसेन यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मधुकर गिलबिले, ॲड. सुनील वाळुंज, शिवाजी मगर, सुधाकर जाधव, शामकांत खळदकर, शशिकांत खळदकर आणि जीवसृष्टी संरक्षण संस्थेचाही गौरव झाला.
डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘वेदनेला धर्म नसतो, त्यामुळे सेवाभावातून झालेल्या कामाचा इतिहास लिहिला जाणे आवश्यक आहे.’’ प्रभुणे यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना समाजाने बळ देण्याचे आवाहन केले. कैलास दुधाळे यांनी प्रास्ताविक केले. सूर्यकांत मुंगसे, कैलास मुसळे, बाळासाहेब घाटे यांनी सूत्रसंचालन केले. संजय घुमटकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाची सरकारला धास्ती! विखे पाटलांची सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

Teachers Post : राज्यातील १३ हजार ११९ उमेदवारांची ‘शिक्षक’ पदासाठी निवड

Marathi News Live Updates : बिडकीन डीएमआयसीत महिलेच्या खुनाने खळबळ

Pune News : ‘आयसर’मध्ये आंदोलनाचा भडका; प्रशासनाच्या मनमानी कारभारावर ठपका

Shubman Gill on IND vs SL Draw: "२५० षटकं अन् सलग तीन दिवस फिल्डिंग..." फॉलोऑननंतरही सामना ड्रॉ राहिल्याबद्दल गिल काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT