The Madgulkar family out from the agitation for the Gadima memorial 
पुणे

गदिमा स्मारकासाठी होणाऱ्या आंदोलनातून माडगूळकर कुटुंबीय पडले बाहेर

सकाळवृत्तसेवा

पुणे : गदिमा स्मारकासाठी 14 डिसेंबरला होणाऱ्या आंदोलनातून माडगूळकर कुटुंबीय बाहेर पडले  आहेत. "इच्छापूर्ती होऊनही लादलेल्या गदिमा स्मारक जनआंदोलनाचा पाठिंबा आम्ही माडगूळकर कुटुंबीय काढून घेत आहोत," असे त्यांनी जाहीर केले आहे.

गेली अनेक वर्षे माडगूळकर कुटुंबीय गदिमांच्या स्मारकासाठी प्रयत्न करीत आहेत. अनेक प्रयत्न करूनही स्मारक होत नसल्यामुळे कवी प्रदीपजी निफाडकर यांनी पुढाकार घेऊन जनआंदोलन चळवळ सुरू केली. त्याला माडगूळकर कुटुंबीयांनी पाठींबा दिला होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी निवेदनात  म्हटले आहे, की स्मारक होण्यासाठी जे शक्य होईल ते करण्याची आमची तयारी होती. आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्याआधी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी माझा संपर्क झाला होता व त्यांनी मला ठामपणे सांगितले होते, की स्मारकासाठी सर्व तयारी झाली आहे. कोरोनामुळे या वर्षी आम्ही काही करू शकलो नाही. त्यावेळी मी त्यांना विनंती केली की तुम्ही एक पत्रकार परिषद घेऊन हे जाहीर करावे. तेव्हा मा.महापौरांनी आपण दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊ असे सांगितले."

आचारसंहितेमुळे महापौरांना जाहीर पत्रकार परिषद  घेता आली नाही आणि त्यांचा माझा 20 दिवस काहीही संपर्क झाला नाही. दरम्यान महापौरांकडून काही संपर्क न झाल्यामुळे आम्ही आंदोलनात ओढले गेलो.  आंदोलनाला पाठींबा देण्याचा विचार आम्ही केला.आचारसंहिता संपल्यामुळे मोहोळ यांनी मला फोन करून पत्रकार परिषदेचे निमंत्रण दिले. पत्रकार परिषद चांगली झाली. त्यांनी त्यात गदिमा स्मारकाविषयी असलेल्या सर्व शंका दूर केल्या. स्मारकाचा पूर्ण आराखडा गदिमांच्या प्रतिभेला साजेसा बनवण्यात आला आहे हे पाहून समाधान वाटले, असे माडगूळकर यांनी स्पष्ट केले आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

महापौरांनी एक महिन्याच्या आत भूमिपूजन करू असा शब्द दिला. त्यांच्या शब्दाचा आदर करून आता हे आंदोलन न करता साहित्य जागर करावा असे मी निफाडकरांना सुचवले. मात्र, त्यांचा एकूण कल हा आंदोलन पुढे चालू ठेवणे असाच दिसला. महापौरांनी  आश्वासन देऊनही प्रशासन काहीच करत नाही, असा दाखवण्याचा निष्फळ प्रयत्न चालू आहे असे आम्हाला लक्षात आले. गदिमांचा कोणीही स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करू नये अशी आमची भूमिका असल्यामुळे विनंती करूनही मागे घेण्यात न आलेल्या या आंदोलनाचा पाठिंबा आम्ही मागे घेत आहोत.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते आमचा शब्द खाली पडू देणार नाहीत अशी खात्री वाटते. मात्र जबरदस्तीने चालू ठेवलेल्या आंदोलनाला आमचा पाठींबा असणार नाही. त्यामुळे माडगूळकर कुटुंबियांसाठी अथवा गदिमा प्रेमापोटी कोणी या आंदोलनाला पाठिंबा देत असेल तर कृपया याबाबतीत पुनर्विचार करावा अशी विनंती मी करत आहे, असेही माडगूळकर कुटुंबीयांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गदिमांच्या पुण्यतिथीला म्हणजे येत्या 14 डिसेंबरला होणाऱ्या आंदोलनाला आम्ही कोणीही माडगूळकर कुटुंबीय उपस्थित राहणार नाही. गदिमा स्मारक मार्गी लागणे हा उद्देश महापौरांच्या पुढाकाराने पूर्ण झाला आहे. त्यामुळे जागराच्या आडून छुपे आंदोलन करण्यास आमचा विरोध आहे. महापौरांनी जाहीर केल्यानंतरही सर्व माध्यमात चुकीच्या बातम्या पसरविण्याचे प्रयत्न आमच्या लक्षात आला. त्यामुळे या आंदोलनाशी आमचा कुठलाही संबंध राहणार नाही,गदिमा प्रेमी हे समजून घेतील, अशी आशा या कुटुंबाने व्यक्त केली आहे. 

''गदिमांच्या साहित्याचा जागर करायला आमचा विरोध नाही. मात्र, जागराच्या आडून छुपे आंदोलन करण्यास आमचा विरोध आहे.''
- सुमित्र माडगूळकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : वातावरण खराब असल्यामुळे...! मोदींनी सांगितलं मणिपूरला उशीरा पोहचण्याचे कारण...

'शिवाजीनगर मेट्रो' स्थानकाचे नाव बदलण्यावरून वाद; फडणवीसांचा तीव्र विरोध, कर्नाटकचे CM म्हणाले, 'आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे...'

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या सत्तर टक्के प्रश्नपत्रिका ‘ऑनलाईन सेट’, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

Movie Review : दशावतार - प्रेम, सूड, श्रद्धा आणि त्यागाची उत्तम गुंफण

Chhagan Bhujbal : ‘ओबीसीतूनच आरक्षण हवे, तर इतर सर्व आरक्षण सोडणार का?’ भुजबळांचे आव्हान

SCROLL FOR NEXT