पुणे

मढ आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम निकृष्ट

CD

ओतूर, ता. २७ ः मढ (ता. जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे डागडुजीचे काम निकृष्ट सुरू असून कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जाण्याची भिती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच आतापर्यंत येथील इमारतीला डागडुजीसाठी जेवढा निधी उपलब्ध झाला त्यात एक नवी इमारत तयार झाली असती अशी चर्चा नागरिकांमध्ये असून डागडुजीचा निधी फक्त ठेकेदार व अधिकारी यांचे खिसे भरण्यासाठी आहे का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
या इमारतीवर आतापर्यंत डागडुजीसाठी खर्च झालेल्या निधीची आणि आता सुरू असलेल्या निकृष्ट कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्यासा सरपंच संघटना व स्थानिक नागरिकांनी केली आहे. मढ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला अंदाजे ३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यात डागडुजीसाठी १ कोटी ७५ लाख रुपये व साहित्य खरेदीसाठी १ कोटी २५ लाख रुपये निधी असे वर्गीकरण असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली. मात्र आता जे डागडुजीचे काम सुरू आहे त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विटा व इतर साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे. तसेच या आधी एक ते दीड वर्षांपूर्वी याच इमारतीवर १५ लाख रुपये खर्च डागडुजीसाठी करण्यात आला होता. त्यावेळी लावण्यात आलेल्या खिडक्या, दरवाजे, चौकटी, फरशा आता काढून परत त्याच ठिकाणी दुसऱ्या लावण्याचे काम सुरू असून सरळसरळ ही शासकीय निधीची उधळपट्टी होत आहे.
मढ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे डागडुजीचे काम थांबवून या कामाची चौकशी करून वापरत असलेल्या साहित्याची गुणवत्ता तपासावी तसेच या इमारतीला तयार करण्यासाठी आलेल्या खर्चापेक्षा डागडुजीला जास्त निधी मिळाला असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप असून सर्व कामांची आणि शासकीय निधीची चौकशी करून दोषी अधिकारी व मनमानी काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अन्यथा नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सोनाबाई दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर कल्याण महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा प्यासा सरपंच संघटनेचे अध्यक्ष व तळेरानचे सरपंच गोविंद साबळे, मढ सरपंच अरुणा मस्करे, पारगावचे सरपंच दत्तात्रेय ढेंगळे, उदापूरचे सरपंच सचिन आंबडेकर, मढ प्यासा समिती अध्यक्ष पंकज हिलम, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मस्करे, अशोक मस्करे, अमोल म्हसणे,निलेश मस्करे आदींनी दिला.


मढ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे डागडुजीचे काम गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सुरू असून मी स्वतः कित्येक वेळा येथे आले. मात्र, आजतागायत संबंधित अधिकारी कोण आहे व ठेकेदार कोण आहे याची माहिती मिळाली नाही. तसेच या कामाच्या इस्टिमेटची मागणी करून सुद्धा दाखवले जात नाही. सर्व ठेकेदार व अधिकारी यांचा मनमानी कारभार सुरू आहे.
-अरूणा मस्करे, सरपंच, मढ


मढ प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत २४ गावे त्यात १४ ग्रामपंचायतीचा व १३ उपकेंद्रांचा समावेश आहे. या ठिकाणी इमारतीच्या डागडुजीचे काम अत्यंत निकृष्टपणे सुरू आहे. हे काम फक्त धूळफेक करून कोट्यवधी रुपयांचा निधी लांबवण्यासाठी चालू असल्याचे दिसून येते. मात्र सरपंच संघटना जोपर्यंत दर्जेदार साहित्य वापरून दर्जेदार काम होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही.
-गोविंद साबळे, अध्यक्ष, प्यासा सरपंच संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT