पुणे

माढा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा ''हेरिटेज वाॅक''

CD

MDH26B04986
माढा ः येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हेरिटेज वॉक उपक्रमांतर्गत येथील ऐतिहासिक किल्ल्याची महत्त्व सांगताना प्रा. मयूर चव्हाण व सहकारी प्राध्यापक.

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली माढ्यातील गढी अन् मंदिरांची माहिती
कला वाणिज्य महाविद्यालयाच्या इतिहास विभागाकडून हेरिटेज वॉक

सकाळ वृत्तसेवा
माढा, ता. २ : येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी हेरिटेज वॉकच्या माध्यमातून माढा शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळांचे ऐतिहासिक महत्त्व व त्यांच्या संवर्धनाची निकड यासंबंधी माहिती घेतली. निंबाळकरांची गढी, विठ्ठल मंदिर आणि माढेश्वरी मंदिराचे ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्रातील वेगळेपण याची माहिती घेतली.

माढा शहरातील रावरंभा निंबाळकरनिर्मित मध्ययुगीन किल्लेवजा गढीला भेट देऊन गढीचा इतिहास व या वास्तूच्या विविध भागांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण केले. विठ्ठल मंदिरास भेट दिली व विठ्ठल मंदिराचा शिवकालीन-शिवोत्तरकालीन इतिहास, मंदिरातील ऐतिहासिक शिलालेख, विठ्ठलमूर्ती व मंदिर परिसरातील ऐतिहासिक शिल्पकला तथा समाधी यांचा ऐतिहासिक कालक्रम विद्यार्थ्यांनी जाणून घेतला. माढ्यातील उत्तरेश्वर-परमेश्वर शिवालयाचे प्राचीन स्थापत्य, मंदिर स्थापत्यकला, मंदिर परिसरात असलेला भारतातील निवडक सतीच्या शिलालेखांपैकी एक अत्यंत दुर्मिळ सतीचा शिलालेख, आवारातील ऐतिहासिक वीरगळ स्मारक शिल्पे व त्यातून दिसणारे तत्कालीन समाजचित्रण यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी प्रस्तुत शिल्पकलेतून घेतला. माढ्याचे कुलदैवत माढेश्वरी देवीच्या दाक्षिणात्य द्राविडीयन स्थापत्यकलेची माहिती विद्यार्थ्यांना दिली. माढेश्वरी मंदिर परिसरात शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्रित भोजन केले.
यावेळी इतिहास विभागप्रमुख प्रा.डॉ. आर. एन. काबळे व इतिहास विभागातील प्राध्यापक प्रा. डॉ. एस. बी. बाबरे, प्रा. मयूर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. जी. डी. हराळे, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले.

कोट
- माढ्यातील ऐतिहासिक वारसा स्थळांचा इतिहास, त्यांचे महत्त्व व येथील ऐतिहासिक स्थापत्याचे, शिल्पकलेचे जतन व संवर्धन झाल्यास येणाऱ्या पिढीला हा ऐतिहासिक वारसा समजू शकेल. इतिहास विभागाचा हा उपक्रम स्थानिक इतिहासाबाबत जागृती करणारा व पर्यटनदृष्ट्या माढ्याचे महत्त्व वाढविणारा आहे.
- डॉ. जी. डी. हराळे, प्राचार्य कला व वाणिज्य महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रस्त्यावर पार्किंगसाठी ऑड-ईवन नियम लागू; मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा मोठा निर्णय, काय बदल होणार?

एक व्यक्ती मालतीचा पाठलाग करत होता... प्रियांका चोप्राने सांगितला लेकीबद्दलचा भयानक अनुभव, म्हणाली- त्याच्यामुळे...

T20 World Cup 2026 Prize Money : वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंना मिळणार प्रत्येकी ६ कोटी रुपये, गौमत गंभीरला किती?

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये धावत्या टिप्परला लागली आग

IPL 2026: वर्ल्ड कप विजेते २ कर्णधार, उपविजेता कर्णधार अन् फायनलमधील सामनावीर; Hardik Pandyaच्या नेतृत्वाखाली चार स्टार खेळणार

SCROLL FOR NEXT