Madhura Kunjir  sakal
पुणे

Madhura Kunjir : मराठमोळ्या कन्येचा लष्करात डंका ; मधुरा कुंजीरची लेफ्टनंटपदाला गवसणी

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील शिक्षक दांपत्याची कन्या असलेल्या मधुरा संतोष कुंजीर हिने‌ केंद्रीय लोकसेवाअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेत लेफ्टनंटपदाला गवसणी घातली.

सकाळ वृत्तसेवा

खुटबाव/ उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील शिक्षक दांपत्याची कन्या असलेल्या मधुरा संतोष कुंजीर हिने‌ केंद्रीय लोकसेवाअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेत लेफ्टनंटपदाला गवसणी घातली. या यशाने एका मराठी मुलीचा कर्तृत्वाचा डंका महाराष्ट्रभर वाजला आहे. प्रशिक्षणानंतर तिची भारतीय सैन्य दलामध्ये आसाम येथे लेफ्टनंटपदावर वर्णी लागली आहे.

मूळचे वाघापूर (ता. पुरंदर) येथील असलेले संतोष कुंजीर व स्वाती कुंजीर हे शिक्षक दांपत्य गेल्या २५ वर्षांपासून उरुळी कांचन येथे स्थायिक झाले आहे. त्यांची कन्या असलेल्या मधुरा हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उरुळी कांचन येथेच झाले. उच्च माध्यमिक शिक्षण फर्ग्युसन विद्यालय (पुणे) येथे, त्यानंतर पीआयसीटी कात्रज येथील कॉलेजमध्ये तिने इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर तिला एका खासगी कंपनीमध्ये १० लाख पॅकेजची नोकरी मिळाली. परंतु, भारतीय सैन्य दलामध्ये सहभागी होण्याची तिची मनोमन इच्छा होती. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी तिने नोकरीचा राजीनामा दिला.

तिने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या सीडीएस परीक्षेमध्ये देशात ११वा क्रमांक मिळवला. त्यानंतर तिने ऑफिसर ट्रेनिंग ॲकॅडमी चेन्नई येथे खडतर प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारले. १ वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करताना अनेक समस्या आल्या. परंतु, देशसेवा करण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तिने प्रशिक्षण पूर्ण केले. चेन्नई येथे ९ मार्च रोजी झालेल्या दीक्षांत समारंभात तिला लेफ्टनंट पदवी प्रदान केली. यावेळी झालेल्या परेडमध्ये‌ ॲकॅडमीने २४० कॅडेटमधून ध्वज घेण्याचा मान तिला दिला. यावेळी तिचे वडील संतोष कुंजीर, आई स्वाती कुंजीर, आजी सिंधू कुंजीर, मामा गौरव जगदाळे आदी उपस्थित होते.

कुटुंबांमध्ये ८ शिक्षक

एकाच गावामध्ये तब्बल ३०० शिक्षक असणाऱ्या वाघापूर येथील मधुरा हिचे कुंजीर कुटुंबीय नोकरीच्या निमित्ताने उरुळी कांचन येथे स्थायिक झाले. या कुटुंबामध्ये एकूण ८ शिक्षक आहेत. मधुरा हिचे आजोबा कै. लक्ष्मण कुंजीर हे शिक्षक होते. आजी सिंधू कुंजीर या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. वडील संतोष कुंजीर व आई स्वाती कुंजीर, चुलते रमेश कुंजीर व चुलती मनीषा कुंजीर, आत्या वासंती कुंजीर, मनीषा कुंजीर हे सर्वजण शिक्षक आहेत. एकाच कुटुंबामध्ये ८ शिक्षक असणाऱ्या मधुरा हिनेही आदर्श वाट निवडत कुंजीर कुटुंबीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

या यशामागे माझे आई-वडील, आजी, कुंजीर व जगदाळे कुटुंबीय यांचा मोठा वाटा आहे. कुटुंबामध्ये मी एकुलती एक मुलगी असूनसुद्धा त्यांनी मला कायम पाठिंबा दिला. लेफ्टनंटपदाची वेगळी वाट निवडल्याचा आनंद आहे. त्यामुळे भविष्यात अनेक मराठी मुली देशसेवा करण्यासाठी पुढे येतील, अशी आशा वाटते.

- मधुरा कुंजीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT