पुणे

‘मधुरांगण-किड्‌स कार्निव्हल’मध्ये मौज

सकाळवृत्तसेवा

टेराकोटा क्‍लेपासून छोटे प्राणी बनविणे, कुकिंग विदाऊट फायर, स्कल्प्चरचे प्रशिक्षण

पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत आपल्या मुलांनी काहीतरी नवीन शिकावं अशी पालकांची इच्छा असते. नावीन्याची ओढ असणारी मुलेही सतत नव्याच्या शोधात असतात. या सर्वांसाठी ‘सकाळ-मधुरांगण’ने एक दिवसाचा ‘किड्‌स कार्निव्हल’ आयोजित केला आहे. सात ते १५ वयोगटातील मुलामुलींसाठी होणाऱ्या या कार्निव्हलमध्ये कुकिंग विदाऊट फायर, टेराकोटा क्‍लेमधून छोटे प्राणी साकारणे आणि रोपे लावणे या तीन उपक्रमांचा समावेश आहे. 

दररोज आईला स्वयंपाक करताना बघून, आपणही काही करावे अशी ऊर्मी मुलांमध्ये जागृत होत असते. परंतु ‘गॅसजवळ जायचे नाही’, या तंबीमुळे मुले हिरमुसली होतात. मिटकॉनशी संलग्न असलेले आणि चॅनेलवरील प्रसिद्ध शेफ प्रसाद कुलकर्णी अशा छोट्या बल्लवाचार्यांना ‘कुकिंग विदाऊट फायर’ या संकल्पनेतून काही खाद्यपदार्थ तयार करायला शिकवणार आहेत. मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि. यासाठी प्रायोजक आहेत. 

फ्लॅटमध्ये कुंडीत रोपे लावून अनेकजण निसर्गाच्या जवळ जाण्याची हौस पूर्ण करून घेत असतात. गच्चीवरच्या किंवा गॅलरीतल्या या बागेत कोणती रोपे, कोणत्या ऋतूत, कोणत्या आकाराच्या कुंडीत लावायची; त्यासाठी किती माती, खते, पाणी वापरायचे याची शास्त्रीय माहिती मुलांना सागर देशमुख आणि त्यांची टीम प्रात्यक्षिकासह देणार आहे. मुलांना संबंधित उपकरणांचे ‘सॉइल बॉक्‍स ज्युनिअर’ हे रु. ३५० किमतीचे कीट विनामूल्य मिळणार आहे. ‘त्रिविध ॲग्रो टेक सोल्यूशन्स’ यासाठी प्रायोजक आहेत.
ओल्या मातीत मनसोक्त खेळण्याच्या हौसेतूनच काही कलाकृती तयार करायला शिकता येते. प्रसिद्ध आर्टिस्ट गौरव काईगडे मुलांना क्‍लेपासून प्राण्यांची शिल्पे घडवायला शिकवणार आहेत. प्रत्येक मुलाला एक किलो क्‍ले मोफत दिली जाणार आहे.

कुकिंग विदाऊट फायर, रोपे लावणे आणि जगविण्याविषयीची संपूर्ण माहिती आणि क्‍लेपासूनची शिल्पनिर्मिती या तीनही कौशल्यांचा उपयोग मुलांना त्यांच्या भावी आयुष्यातही होणार आहे.

‘किड्‌स कार्निव्हल’ नंतर त्याच ठिकाणी ‘पालकांच्या जीवनशैलीला वळण लावणाऱ्या ‘हेल्थ का मॉनिटर’ या डीव्हीडीचे प्रकाशन सायंकाळी सहा वाजता होणार आहे. ‘किड्‌स कार्निव्हल’मध्ये सहभागी मुलांना ‘सकाळ मधुरांगण’तर्फे रु. ३५० किमतीची ही डीव्हीडी मोफत मिळणार आहे. 

येत्या रविवारी (ता. २३) ‘मधुरांगण’ची सभासद नोंदणी सुरू होणार आहे. सदस्यांसाठी ‘किड्‌स कार्निव्हल’चे सहभाग शुल्क रु. ६०० असून, सदस्येतर वाचकांसाठी शुल्क रु. ७५० आहे. नोंदणी करताना शुल्क रोख भरावे लागेल. या शुल्कात सहभागींना रु. १००० पर्यंतचे किट मोफत दिले जाणार आहेत. सहभागी मुलांनी सोबत दोन नॅपकिन, एक मोठी कॅरिबॅग आणि पाण्याची बाटली आणणे आवश्‍यक आहे.

‘किड्‌स कार्निव्हल’
रविवार, ता. २३ एप्रिल
स्थळ - मॅजेन्टा लॉन्स, राजाराम पुलाजवळ, डी. पी. रोड
वेळ : दु. १२.३० ते रात्री ८ 
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी -
८३७८९९४०७६ किंवा ९०७५०१११४२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT