पुणे

पुरात व्हॅन वाहून गेली; नऊ जणांचा मृत्यू

CD

पुरात व्हॅन वाहून गेली;
नऊ जणांचा मृत्यू
राजगड (मध्य प्रदेश), ता. १० (पीटीआय) : मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या ओढ्यातून व्हॅन नेण्याचा प्रयत्न करताना ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका मुलीचा समावेश आहे. सोमवारी सकाळी सुमारे नऊ वाजता सारंगपूरजवळील पडाना बाह्यवळण पुलाजवळ ही दुर्घटना घडली. व्हॅनमध्ये ११ जण प्रवास करीत होते.
व्हॅनमधील दोन जणांनी पोहत जाऊन आपला जीव वाचविला. स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी आणि ग्रामस्थांनी चालकाला पुढे न जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, चालकाने त्याकडे दुर्लक्ष करून व्हॅन पाण्यातून नेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पाण्याच्या जोरदार प्रवाहाने व्हॅन वाहून नेली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता दोरखंडाच्या साह्याने बचावकार्य सुरू केले. काही प्रवाशांना बाहेर काढण्यात त्यांना यश आले. मात्र, नऊ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सारंगपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद सिंह यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे परिसरातील नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत होते. पडाना बाह्यवळणजवळील रस्त्यावरील ओढ्याच्या प्रवाहात चालकाने निष्काळजीपणे व्हॅन घातली. काही क्षणांतच व्हॅन पाण्यात बुडाली आणि नऊ जणांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT