hospital1.jpg 
पुणे

हडपसर येथील बंद असलेले 'ते' हाॅस्पिटल अखेर सुरू होणार

सकाळवृत्तसेवा

हडपसर (पुणे) : महापालिकेच्या खा. कै. अण्णासाहेब मगर प्रसुतिगृहातील २०१५ पासून बंद असलेले प्रसुतिगृह लवकरच सुरू होणार असून या रूग्णालयात सोनोग्राफीची सोय देखील करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे या भागातील गरीब व गरजू नागरिकांची सोय होणार आहे. रूग्णालयात सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक असतानाही रूग्ण ते पाळत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. येथील प्रसुतिगृह नादुरूस्त असल्याच्या कारणास्तव बंद असल्यामुळे या भागातील गरोदर महिलांची गैरसोय होत होती. त्यामुळे अन्य रूग्णालयात प्रसुतिसाठी गरोदर मातांना जावे लागत आहे. यापूर्वी ५० लाख रूपये खर्च करून महापालिकनेने या रूग्णालयाचे नूतनीकरण केले होते. मात्र ते काम निकृष्ठ असल्याने प्रसुतिगृह बंदच ठेवावे लागले आहे. त्यामुळे गरोदर महिलांची गैरसोय होत आहे.

रूग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारी नेहा जगताप म्हणाल्या, रूग्णालयांत रोज २५० हून अधिक रूग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. मी याठिकाणी नव्यानेच चार्ज घेतला असल्याने बंद प्रसुतिगृहाबाबत ते कधी सुरू होईल हे, मला सांगता येत नाही. मात्र रूग्णालयात ओपीडी बेसिसवर आलेल्या लोकांसाठी आवश्यकत्या सुविधा व औषधे रूग्णालयात उपलब्ध आहेत. नागरिक सविता जगताप म्हणाल्या, गेल्या सात- आठ वर्षांपासून मगर रूग्णालयातील प्रसुतिगृह बंद आहे. डॅाक्टर व कर्मचा-यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोईला सामोरे जावे लागते. येथील डॅाक्टर रूग्णांवर उत्तमप्रकारे उपचार करतात. मात्र महापालिकेने त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविणे गरजेचे आहे. ही बाब महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्षात घेवून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत नगरसेविका हेमलता मगर म्हणाल्या, चालू आर्थिक वर्षात या रूग्णालयाच्या कामासाठी १ कोटी रूपयांची आर्थिक तरतूद केली आहे. प्रसुतिगृह सुरू करण्यासाठी आवश्यक ती दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या रूग्णालयातील प्रतुतिगृह सुरू होणार आहे. तसेच सोनोग्राफी सुरू करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. रूग्णालयाची इमारत ६० वर्षे जुनी आहे. त्यामुळे या जागेवर मल्टीस्पेशालिटी रूग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT