maha vikas aghadi shetkari akrosh morcha start from tomorrow pune politics Esakal
पुणे

Pune News : महाविकास आघाडीच्या 'शेतकरी आक्रोश मोर्चा'ला उद्यापासून प्रारंभ

पुण्यात ३० तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत सभा

रवींद्र पाटे ः सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या 'शेतकरी आक्रोश मोर्चा'ची जय्यत तयारी पूर्ण झाली असून उद्या (दि. २७ रोजी) जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या मोर्चाला प्रारंभ होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभेने 'शेतकरी आक्रोश मोर्चा'ची सांगता होणार आहे. अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

संसदेतून निलंबित केल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन खासदार डॉ. कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी 'शेतकरी आक्रोश मोर्चा'चे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. त कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवावी तसेच कांदा निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण ठरवावे,

खासगी व शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, बिबटप्रवण तालुक्यात शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा व्हावा, पीक विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून नुकसान भरपाई तातडीने मिळावी,

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निश्चित स्वरूपाचे 'शैक्षणिक कर्ज ' धोरण लागू करावे या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेससह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एल्गार पुकारला असून दि. २७ ते ३० डिसेंबर दरम्यानच्या भव्य 'शेतकरी आक्रोश मोर्चा' आयोजित केला आहे.

या मोर्चाला २७ तारखेला जुन्नर येथून या सुरुवात होणार असून सकाळी ८ वाजता ओतूर येथे पदयात्रा व कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर आळेफाटा येथे कोपरा सभा, नारायणगाव येथे पदयात्रा व एस.टी. स्टँडजवळ होणार असून दरम्यान ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून या आक्रोश मोर्चाचे स्वागत केले जाणार आहे.

त्यानंतर दुपारी ३ वाजता कळंब येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर कोपरा सभा आणि मंचर बाजार समिती येथून पदयात्रेने लक्ष्मी रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभा होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता राजगुरुनगर बाजार समिती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाजवळ सभा आणि त्यानंतर राजगुरुनगर एस.टी. स्टँड येथील हुतात्मा राजगुरू आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पाबळ चौकातून वाहनांद्वारे चाकणला रवाना होईल.

रात्री ८ वाजता चाकण बाजार समिती प्रवेशद्वारापासून काढण्यात येणाऱ्या पदयात्रेचा समारोप बाजारपेठेतून एस.टी.स्टँड, तळेगाव चौक येथे होईल. त्यानंतर चौफुला, करंदी मार्गे केंदूर येथे मोर्चाचा पहिला मुक्काम होईल.

२८ डिसेंबर रोजी सकाळी केंदूरच्या श्रीराम चौकात सभा आयोजित करण्यात आली असून त्यानंतर पाबळ येथील लोणी चौकात कोपरा सभा होईल. त्यानंतर धामारी, मुखी, जातेगाव या ठिकाणी शेतकऱ्यांकडून स्वागत स्वीकारुन दुपारी १.३० वाजता शिक्रापूर येथे पाबळ चौक ते चाकण चौक पदयात्रा काढण्यात येणार आहे.

त्यानंतर दुपारी २.०० वाजता तळेगाव ढमढेरे येथील सावता माळी सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर हा आक्रोश मोर्चा टाकळीभीमा, पारोडी, दहीवडी, उरळगाव मार्गे न्हावरा येथे येणार आहे.

न्हावरा येथे तळेगाव फाटा ते निर्वि रस्त्यादरम्यान पदयात्रा करुन निर्वि, कोळगाव डोळस, कुरुळी, वडगाव रासाई मार्गे मांडवगण फराटा येथे येणार असून या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेनंतर हा आक्रोश मोर्चा तांदळी, काष्टी मार्गे दौंड येथे मुक्कामी जाईल.

२९ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता दौंड शहरात महात्मा फुले पुतळा ते आंबेडकर चौक, गांधी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दरम्यान पदयात्रा काढण्यात येईल. त्यानंतर कुरकुंभ, मळद, रावणगाव मार्गे खडकी येथे येईल. याठिकाणी बारामती चौकातील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मोर्चाचे रुपांतर सभेत होईल.

त्यानंतर भिगवण आणि पळसदेव येथे कोपरा सभा करुन आक्रोश मोर्चा दुपारी २.३० वाजता इंदापूर येथे येईल. इंदापूरात पदयात्रा झाल्यानंतर निमगाव केतकी येथे कोपरा सभा झाल्यानंतर मसाळवाडी, काटेवाडी, लिमटेक, पिंपळी, बांदलवाडी मार्गे बारामती आल्यावर बारामती नगरपालिकेसमोर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यादिवसाचा मुक्काम बारामती शहरात होईल.

शेतकरी आक्रोश मोर्चा दि. ३० डिसेंबर रोजी बारामती येथून मेडद, कऱ्हावागज, जळगाव, माळवाडी, तारडोळी मार्गे मोरगाव येथे आल्यावर मयुरेश्वराचे दर्शन घेतल्यावर मंदिरासमोर कोपरा सभा होईल.

त्यानंतर आंबी बु. मार्गे जेजुरी येथे आल्यावर कोपरा सभा होईल. त्यानंतर आक्रोश मोर्चा शिंदवणे मार्गे हवेली तालुक्यात प्रवेश करेल. शिंदवणे येथे स्वागत स्वीकारुन उरळीकांचनला रवाना होईल. या ठिकाणी जुन्या इलाईट हॉटेलसमोर कोपरा सभा होणार असून त्यानंतर सोरतापवाडी फाटा, कुंजीरवाडी फाटा, थेऊर फाटा मार्गे लोणी काळभोर येथे आल्यावर रेल्वे स्टेशनजवळ कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

लोणी काळभोर येथून कवडीपाट टोलनाका मार्गे मांजरी फार्म, शेवाळवाडी फाटा, १५ नंबर, हडपसर गाडीतळ मार्गे पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर सभा होणार असून माजी केंद्रीय कृषिमंत्री पवार, खासदार संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT