पुणे

महाबळेश्वर येथे सुशोभीकरणाच्या कामाची नगराध्यक्ष व सा.बां उपविभागीय अधिकारी यांच्या कडून पाहणी

CD

महाबळेश्वरात सुशोभीकरण कामाची पाहणी

नगराध्यक्षासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची उपस्थिती

महाबळेश्वर, ता. ७ ः येथील बाजारपेठेतील रस्त्याच्या सुशोभीकरणाचे काम उन्हाळी हंगामापूर्वी पूर्ण व्हावे, यासाठी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी नगरसेवकांसह कामाची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अजय देशपांडे हे देखील उपस्थित होते. नगराध्यक्षांनी केलेल्या सूचनेनुसार कामाचा वेग वाढवून सुशोभीकरणाचे काम मार्चअखेर पूर्ण करण्यात येईल, असे देशपांडे यांनी पालिकेच्या पाहणी समितीला सांगितले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाबळेश्वर बाजारपेठेच्या सुशोभीकरणासाठी १०० कोटींचा निधी मंजूर करून राज्याच्या पर्यटन विभागास आराखडा करण्याच्या सूचना केल्या होत्या. तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाकडून आराखडा तयार करून घेतला. या आराखड्यानुसार बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरण, छत्रपती शिवाजी महाराज चौक व सुभाषचंद्र बोस चौक यांचे सुशोभीकरण, पेटिट ग्रंथालय हेरिटेज इमारती दुरुस्ती व सुशोभीकरण करणे, बाजारपेठेला समांतर असलेला मशिद रोड व गणेशपेठ रस्ता यांचे सुशोभीकरण या सर्व कामांचा समावेश आराखड्यामध्ये करण्यात आला होता. त्यानुसार काम सुरू झाले.
काही महिन्यांतच एका बाजूला कामाच्या दर्जाबाबत तक्रारी सुरू झाल्या, तर दुसरीकडे बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणास दुकानदारांनी विरोध केला. त्यामुळे आराखड्यात वारंवार बदल करण्यात आले. दरम्यान पालिकेने ज्या ठेकेदारास हे काम दिले होते. त्या ठेकेदाराचा ठेका रद्द करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने वेगाने या कामाला सुरुवात केली. या कामाचे दोन टप्पे पूर्ण केले असून, पोलिस ठाणे ते सुभाष चौक या तिसऱ्या टप्प्यातील कामाला प्रारंभ केला आहे. हे सुरू असलेले काम उन्हाळी हंगामापूर्वी पूर्ण होणार की नाही याबाबत दुकानदारांमध्ये संभ्रम आहे.
आज नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पाहणी समितीने बाजारपेठेतील कामाला भेट दिली व कामाची पाहणी केली. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अजय देशपांडे, पालिकेचे गट नेते ॲड. संजय जंगम, नगरसेवक संतोष शिंदे, अफजल सुतार, विमलताई पार्टे, रोहित ढेबे, संगीता वाडकर, राहुल पिसाळ, संतोष आखाडे, स्मिता पाटील, पल्लवी कोंढाळकर, विशाल तोष्णीवाल व अतुल सलागरे आदी मान्यवर उपस्थित होते.

-------------------------------

05038
महाबळेश्वर : सुशोभीकरण कामाची पाहणी करताना नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी.

--------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी एक महिन्याची सूट? अमेरिकेच्या दाव्यावर भारत सरकारची स्पष्टता, काय म्हटलं?

T20 WC , IND vs NZ: न्यूझीलंडच्या कर्णधारानेही भारतीयांनाच दिली वॉर्निंग; २०२३ वर्ल्ड कपमध्ये फायनलला जे झालं, तसंच उद्या पण...

Iran-America War: ''ते चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होते..'', अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचं जहाज बुडाल्यानंतर भारताची प्रतिक्रिया

डोळ्यात आणि तोंडात तिखट टाकलं, अमानुष मारहाण अन्..., दत्तक घेतलेल्या मुलीसोबत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; संतापजनक कारण समोर

Latest Marathi News Live Update : १४ हजारासाठी विधवा महिलेचा खून, आरोपीस अकोटमधून अटक

SCROLL FOR NEXT