पुणे

पाचगणी : महाबळेश्वरच्या तळदेवला शिंदेंची ''गती'', तर भिलारमध्ये राष्ट्रवादीची ''शक्ती'' कायम! ; तालुक्यात ''फिफ्टी-फिफ्टी''चा फॉर्म्युला; भाजप निष्प्रभ

CD

महाबळेश्वरात फिफ्टी-फिफ्टी

भिलार गट राष्ट्रवादीकडे, तर तळदेव गट शिवसेनेच्या ताब्यात

पाचगणी, ता. ९ : महाबळेश्वर तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट आणि चार पंचायत समितीच्या गणांचा निकाल जाहीर झाला असून, मतदारांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला समान जागा निवडून दिल्या. दरम्यान, भाजपला कुठेही आपला प्रभाव टाकता आला नाही.

महाबळेश्वर तालुक्यात पूर्वीपासून भिलार गट हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. (कै.) बाळासाहेब भिलारे यांच्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी वर्चस्व कायम राखले आहे. या भिलार गटात राष्ट्रवादीच्या संजय केळगणे यांनी भाजपच्या रंजना कदम यांचा ६०९३ मताधिक्याने पराभव केला. भिलार गणात राष्ट्रवादीच्या वंदना भिलारे यांनी भाजपच्या सुप्रिया भिलारे यांच्यावर ४१४४ मतांनी विजय मिळवला. मेटगुताड गणात भाजपच्या अमिना शारवान यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीच्या शकुंतला चोरमले यांनी १०८६ मतांनी विजयी झाल्या.

तळदेव गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाव गटात असल्याने या ठिकाणी राष्ट्रवादीला मोठे आव्हान होते. तळदेव गटात राष्ट्रवादीच्या संजय गायकवाड यांचा शिवसेनेच्या अजित सपकाळ यांनी तब्बल तीन हजार मतांनी पराभव केला, तर कुंभरोशी गणात राष्ट्रवादीच्या सचिन उतेकर यांच्या विरुद्ध शिवसेनेच्या संजय मोरे यांनी ३३४ मतांनी विजय मिळवला. तळदेव गणात शिवसेनेच्या संजय जाधव यांनी राष्ट्रवादीच्या संजय उतेकर यांचा २०१० मतांनी पराभूत केले.

महाबळेश्वर तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे तिकीट वाटपावरूनच राष्ट्रवादीत आणि शिवसेनेत झालेली सुंदोपसुंदी विजयाला मारक ठरणार, अशी चिन्हे दिसत होती; परंतु मंत्री मकरंद पाटील यांनी जनसंपर्काच्या जोरावर व राजेंद्र राजपुरे यांनी केलेल्या व्यूहरचनेमुळे राष्ट्रवादीने भिलार गट राखण्यात यश मिळवले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कोट्यवधींच्या विकासाच्या जोरावर तळदेव गट मात्र ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. या निकालाने तालुक्याच्या राजकारणात नवी समीकरणे मांडली आहेत. या निवडणुकीत सर्वात मोठा फटका भाजपला बसला आहे.

07258
महाबळेश्वर : राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजयानंतर काढलेली भव्य मिरवणूक व जल्लोष. (रविकांत बेलोशे ः सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

Latest Marathi News Live Update : इंधन बचतीचे धडे जनतेला, पण महिला हक्क समितीचा दिंडोरी दौरा ताफ्यामुळे चर्चेत

PBKS vs MI Live : १४ चेंडूंत ४ विकेट्स! शार्दूल ठाकूरचा भन्नाट मारा... श्रेयस अय्यर आला तसा गेला, जसप्रीतचा डाव यशस्वी; Video

Pune News : नदी काठ सुधारसाठी मिळाली ५२ हजार चौरस मिटर जागा; राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT