महाबळेश्वर- पाचगणी रस्त्याचे कामाबाबत नाराजी
शिवसेना आक्रमक, शिष्टमंडळाची अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा
महाबळेश्वर, ता. ३ ः महाबळेश्वर- पाचगणी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम वेळेत, दर्जेदार पद्धतीने करून महाबळेश्वरवासीयांसह पर्यटकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करून काम गुणवत्तापूर्वक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाबळेश्वर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला.
नुकतीच एक बैठक येथील वेण्णा दर्शन सभागृहात झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संतोष भंपलवार, प्राधिकृत अभियंता मोहन आंदे, ठेकेदार कंपनीचे अभियंते आदींसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजेश कुंभारदरे, भाजपचे नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, शंकर ढेबे, महेश गुजर, व्यापारी आशिष नायडू, केतन यादव, रमेश शिंदे, अंकुश उललकार, वैभव भिलारे उपस्थित होते.
या बैठकीनंतर महाबळेश्वर ते अवकाळीपर्यंतच्या रस्त्याची अधिकारी व शिष्टमंडळ अशी सयुक्तिकरीत्या पाहणी करून अधिकाऱ्यांनी अडचणी जाणून घेतल्या. महाबळेश्वर- पाचगणी मुख्य रस्ता खड्ड्यात गेल्यामुळे नागरिकांसह पर्यटकांमधून संताप व्यक्त केला जात होता. सध्या प्रचंड खड्ड्यांनी वेढलेल्या लिंगमळा परिसरातून तात्पुरत्या स्वरूपात डांबरीकरणाच्या कामास देखील सुरुवात झाली आहे. या शिष्टमंडळाची अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली.
या वेळी राजेश कुंभारदरे यांनी खड्डेयुक्त रस्त्यांच्या अडचणींचा पाढाच अधिकाऱ्यांसमोर वाचला. भाजपचे रवींद्र कुंभारदरे यांच्यासह शंकर ढेबे, आशिष नायडू, केतन यादव, महेश गुजर आदींनी या चर्चेत सहभागी होत अधिकारी वर्गास मेढा रस्त्यासारखे दर्जेदार काम करून नागरिकांसह पर्यटकांना दिलासा देण्याचे आवाहन केले. त्यानंतर कार्यकारी अभियंता संतोष भंपलवर यांनी महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या वतीने सुरूर ते वाई, वाई ते पाचगणी, पाचगणी ते महाबळेश्वर व पोलादपूर ते महाबळेश्वर असे या रस्त्याच्या कामाचे चार भाग केले गेले असल्याची माहिती दिली. पोलादपूर ते महाबळेश्वरचे काम सुरू आहे, तर महाबळेश्वर पाचगणी या १८ किलोमीटर रस्त्याच्या कामामध्ये अडचणी येत आहेत. या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे भंपलवार यावेळी नमूद केले. या बैठकीत शिष्टमंडळाच्या वतीने महाबळेश्वर ते वेण्णालेक या रस्त्यास पर्यायी रस्ते असल्यामुळे हे काम आधी सुरू करावे, अशी आग्रही मागणी केली. त्यामुळे या पहिल्या टप्प्याचे काम आता सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर पुढील काम देखील टप्प्याटप्याने सुरू करण्यात येणार आहे.
या बैठकीनंतर महाबळेश्वर ते अवकाळी या रस्त्याची पाहणी अधिकारी वर्गासह शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. महाबळेश्वर ते लिंगमळापर्यंतच्या फुटपाथचे रखडलेले कामामुळे येणाऱ्या अडचणीकडे राजेश कुंभारदरे यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले हे काम देखील सुरू होणार आहे. पर्यायी रस्ते असल्यामुळे हे काम युद्धपातळीवर सुरू करून येत्या उन्हाळी हंगामाआधी पूर्ण करण्याची मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. प्रचंड खड्डेयुक्त झालेल्या लिंगमळा परिसरातून डांबरीकरणाच्या कामास देखील शिवसैनिकांच्या प्रयत्नाने सुरुवात झाली आहे.
04980
महाबळेश्वर ः अवकाळी रस्त्याची पाहणी करताना रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.