पुणे

पांचगणी : पाणलोट क्षेत्रात चिंतेचे ढग! पांचगणी, महाबळेश्वरमध्ये १० टक्के पाणीकपात लागू; उन्हाळ्यापूर्वीच प्रशासनाकडून नियोजनास सुरुवात

CD

पाचगणी, महाबळेश्वरात १० टक्के पाणीकपात

प्रशासनाकडून नियोजन; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने उचलली कठोर पावले

पाचगणी, ता. २५ : महाबळेश्वर तालुक्यावर यंदा ओढावलेल्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीची आणि एल निनोच्या धोक्याची दाहकता आता प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचू लागली आहे. उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कठोर पावले उचलली असून, प्रसिद्ध पर्यटन स्थळे असलेल्या पाचगणी आणि महाबळेश्वर शहरांमध्ये तातडीने १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. वाढत्या तापमानाची चाहूल लागण्याआधीच प्रशासनाने उचललेल्या या पावसामुळे नागरिकांमध्ये पाणी बचतीची निकड निर्माण झाली आहे.
​राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन, तसेच जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार, आगामी ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत राज्यातील उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, यंदाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत महाबळेश्वर तालुक्याचाही समावेश करण्यात आला आहे. वेण्णा लेक धरणातून पाचगणी आणि महाबळेश्वर शहरांना पाणीपुरवठा केला जातो; मात्र जलसाठ्यातील घट आणि आगामी काळातील भीषण पाणीटंचाई टळण्यासाठी प्रशासनाला हा कठोर निर्णय घेणे भाग पडले आहे.
​या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे साताऱ्याचे कार्यकारी अभियंता आणि पाचगणी उपविभागाचे सहायक कार्यकारी अभियंता यांनी पाचगणी व महाबळेश्वर गिरिस्थान नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना अधिकृत पत्र पाठवून पाणीकपातीची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयानुसार आता दोन्ही शहरांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात थेट १० टक्के कपात केली जाणार आहे.
​पर्यटनासाठी देशभरातून लाखो पर्यटक दाखल होणाऱ्या या दोन्ही शहरांमध्ये स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही पाणी वापरावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. नगरपालिकांच्या सर्व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना याविषयी तातडीने सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले असून, शहरातील प्रत्येक घरापर्यंत आणि नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवून पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
-------------------------
‘नारा’ आता आचरणाचा भाग

‘पाणी जपून वापरा’ हा केवळ नारा न राहता प्रत्येकाच्या आचरणाचा भाग बनण्याची वेळ आता या दोन्ही थंड हवेच्या ठिकाणी आली असून, नागरिकांच्या सहकार्याशिवाय या जलसंकटावर मात करणे कठीण ठरणार आहे.

-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil: कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही; दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

Solapur Crime: मेहुणीला शिक्षणासाठी घरी आणलं, पत्नी असताना तिच्यासोबत लग्न केलं अन्...; सासऱ्याने घडवला रक्तरंजित थरार

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

Madhuri Dixit Kon Honaar Karodpati : "बाई, तुम्ही खूप कडक बोलताय..."; शिक्षिकेसमोर थेट विद्यार्थी बनली माधुरी दीक्षित! 'कोण होणार करोडपती'मधील सुंदर क्षणाचा व्हिडिओ व्हायरल!

Latest Marathi News Update : चौकशीपूर्वीच रुग्णालयातून धूम ठोकून राणा सूर्यवंशी पसार! बारामती हल्ला प्रकरणात खळबळ, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT