पुणे

सातारारोड कंत्राटदार जावई आहे का

CD

कंत्राटदार काय जावई आहे का?

शशिकांत शिंदेंचे सुरूर- पोलादपूर रस्त्याबाबत विधान परिषदेत सवाल

सातारारोड, ता. ९ : कंत्राटदार काय जावई आहे का? असा संतप्त सवाल करत सुरूर ते पोलादपूर या मार्गावरील काम रखडल्याने महाबळेश्वर, पाचगणीचे पर्यटन गेल्या दीड-दोन वर्षांपासून अडचणीत आले असून, या प्रश्नामध्ये पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत केली. त्यावर याप्रश्नी बांधकाममंत्र्यांशी चर्चा करून बैठक लावली जाईल, असे उत्तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
सुरूर ते पोलादपूर या मार्गावरील रखडलेले काम आणि त्यामुळे महाबळेश्वर, पाचगणी येथील पर्यटन व्यवसायावर झालेल्या परिणामाकडे शासनाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘‘महाबळेश्वर, पाचगणीचे पर्यटन गेल्या दीड-दोन वर्षांपासून अडचणीत आले आहे. सुरूर ते पोलादपूर या मार्गावरील काम रखडल्याच्या निषेधार्थ महाबळेश्वर, पाचगणीकरांनी बंद आंदोलन केले. हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, दोन्ही शहरांच्या पर्यटनावर विपरित परिणाम झाला आहे.’’
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी केलेल्या आंदोलनात व्यापारी, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्याचबरोबर याप्रश्नी आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाबळेश्वर, पाचगणीकरांनी दिला आहे. या कामाकडे शासनाच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे तेथील पर्यटन ठप्प झाल्याने स्थानिक नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. कंत्राटदार काय जावई आहे का? पालकमंत्र्यांनी या विषयामध्ये लक्ष घालावे. यासंदर्भात मी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी बोललो आहे.
ते म्हणाले, ‘‘याप्रश्नी तातडीने बैठक लावतो. त्यानुसार पालकमंत्र्यांनी तातडीने बैठक लावून यासंदर्भात निर्णय घ्यावा.’’
त्यावर पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘‘याप्रश्नी बांधकाममंत्र्यांशी चर्चा करून याबाबतची बैठक
लावली जाईल.’’
----------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT