पुणे

महाबळेश्वर बंदनंतर आंदोलन तीव्र; रखडलेल्या रस्त्यांवर रास्ता रोकोचा इशारा; महाबळेश्वर बंदनंतर शिष्टमंडळाची प्रशासनाशी भेट

CD

महाबळेश्वरात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

रस्त्याच्या कामातील दिरंगाईबाबत शिष्टमंडळाचे साताऱ्यात प्रशासनाला निवेदन

महाबळेश्वर, ता. ९ ः रस्त्याच्या कामात होत असलेल्या दिरंगाईबाबत महाबळेश्वरात काल बंद पाळण्यात आला. त्यानंतर आज येथील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संतोष पाटील, तसेच पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
निवेदनात महाबळेश्वर- पाचगणी- वाई ते सुरूरदरम्यानच्या रस्त्याच्या अकार्यक्षम व रखडलेल्या कामाबाबत शासनाने तातडीने गंभीर दखल घेऊन हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावर जिल्हाधिकारी पाटील व पोलिस अधीक्षक दोशी यांनी यासंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिली. मात्र, शहरातील आंदोलनकर्त्यांना अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे या प्रश्नावर ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे.
या वेळी नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, अफझल सुतार, संदीप साळुंखे, अतुल सलागरे, विशाल तोष्णीवाल, विजय नायडू, अमित ढेबे, टॅक्सी संघटनेचे दादाभाई मानकर, इरफान कुरेशी, मारुती डोईफोडे, राजेंद्र बावळेकर, इमामभाई नालबंद, नंदकुमार वायदंडे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, आमदार शशिकांत शिंदे यांनी महाबळेश्वर परिसरातील रस्त्यांच्या रखडलेल्या कामाविरोधात नागरिकांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा मुद्दा विधिमंडळाच्या सभागृहात उपस्थित केला. यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माहिती देताना यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात येणार असल्याचे सभागृहात सांगितले.
-------------------------------
चौकट

मंत्रालयातील बैठकीत सहभागी करा

महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात मंत्रालयात बैठक होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली असली, तरी या बैठकीत केवळ एमएसआयडीसीचे अधिकारी व ठेकेदार यांच्यापुरती चर्चा मर्यादित न ठेवता स्थानिक आंदोलनकर्त्यांनाही सहभागी करून घ्यावे, अशी ठाम मागणी शिष्टमंडळाने केली आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी आणि पर्यटन व्यवसायिकांना प्रत्यक्ष अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे त्यांचे मत विचारात घेणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाचे म्हणणे आहे.
-----------------------------
05044
सातारा : येथे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन देताना महाबळेश्वरचे शिष्टमंडळ.
-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT