पुणे

महाबीजच्या ‘उत्कर्ष’ मूग वाणाला न्यायालयाचा मोठी दिलासा निर्मल सीड्सचा दावा फेटाळला

CD

‘महाबीज’च्या ‘उत्कर्ष’ मूग वाणाला न्यायालयाचा दिलासा
--
अहवालांच्या आधारे निर्मल सीड्सचा दावा फेटाळला
--

ॲग्रोवन वृत्तसेवा

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) ‘उत्कर्ष’ या संशोधित मूग वाणाबाबत पाचोरा (जि. जळगाव) येथील निर्मल सीड्स प्रा. लि.ने दाखल केलेला दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. संबंधित वाण हा निर्मल सीड्सच्या मूग वाणासारखाच असल्याचा आरोप कंपनीने केला होता. मात्र वैज्ञानिक पुरावे आणि अधिकृत अहवालांच्या आधारे न्यायालयाने हा दावा अमान्य केल्याची माहिती महाबीज प्रशासनाने दिली.

या प्रकरणात महाबीजने न्यायालयात डीएनए फिंगरप्रिंटिंग अहवाल, डी.यू.एस. (भिन्नता, एकरूपता आणि स्थैर्य) चाचणीचे निष्कर्ष, शासनाची राजपत्रित अधिसूचना, तसेच वाणाची वंशावळ यांसह विविध वैज्ञानिक पुरावे सादर केले.

न्यायालयाच्या निर्देशानुसार, दोन्ही कंपन्यांच्या मूग वाणांचे नमुने केंद्र शासनाच्या वनस्पती जातींचे संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरण यांच्याकडून तपासण्यात आले. या तपासणीत दोन्ही वाण परस्परांपेक्षा भिन्न असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, महाबीजला ‘उत्कर्ष’ वाणासाठी संबंधित प्राधिकरणाकडून नोंदणी प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे.

न्यायालयाने निर्मल सीड्सला दाव्याच्या समर्थनार्थ अनेकदा संधी दिली. मात्र कंपनीकडून कोणतेही ठोस अथवा वैज्ञानिक पुरावे सादर करण्यात आले नाहीत. तसेच सुनावणीदरम्यान वारंवार अनुपस्थित राहिल्याने दाव्यात तथ्य नसल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने तो फेटाळून लावल्याचे ‘महाबीज’ने सांगितले.
--
चौकट
संशोधन विभागाचे कौतुक

या निकालानंतर महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, संचालक वल्लभराव देशमुख आणि संचालक डॉ. रणजित सपकाळ यांनी संशोधन व विकास विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल लहाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. हा निकाल वैज्ञानिक संशोधन, बौद्धिक संपदा हक्क आणि पारदर्शक संशोधन प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ करणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही शेतकऱ्यांसाठी उच्च दर्जाचे, विश्वासार्ह आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध बियाणे विकसित करण्यासाठी ‘महाबीज’ कटिबद्ध राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: घृणास्पद, आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट; गडकरींची बदनामी करणाऱ्या पोस्ट हटवा, हायकोर्टाचे आदेश

अतिक अहमदच्या धाकट्या लेकासह दोघांचा अपघातात मृत्यू, तुरुंगातल्या भावाला भेटून परतताना दुर्घटना

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी उचलले ७४.७५ लाख; वसुलीला सुरुवात

रवि किशन यांना लेकीनेच केलं ट्रोल; रिव्हाचा भन्नाट Reel पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, Viral Video

Marathi News Live Updates : झाशीहून प्रयागराजला परतताना भीषण अपघात; अतीक अहमदचा धाकटा मुलगा अबान अहमदचा मृत्यू

SCROLL FOR NEXT