mahadev app beting gambling fraud at narayangaon crime branch action police Sakal
पुणे

Pune Crime News : नारायणगाव येथे महादेव ऍप द्वारे बेकायदेशीर ऑनलाईन जुगार: गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

इमारतीतील तीन मजले तीन महिन्यापूर्वी नारायणगाव येथील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याने आयटी कंपनी सुरू करण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतले होते.

सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : नारायणगाव येथे पुणे -नाशिक महामार्गालगत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका चार मजली इमारतीत महादेव ऍप द्वारे बेकायदेशीर रित्या सुरु असलेल्या ऑनलाईन जुगार (सट्टा ) व्यवसायावर पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाने आज पहाटेच्या सुमारास छापा टाकला.

या प्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बुकिंग करणाऱ्या सुमारे साठ ते सत्तर तरुणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी फरार असून त्याची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

या बाबत माहिती अशी : पुणे नाशिक महामार्ग लगत मध्यवर्ती ठिकाणी चार मजली इमारत आहे. या इमारतीतील तीन मजले तीन महिन्यापूर्वी नारायणगाव येथील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याने आयटी कंपनी सुरू करण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतले होते.

मात्र संबंधित व्यक्तीने या ठिकाणी महादेव ऍप द्वारे बेकायदेशीर रित्या ऑनलाईन जुगार (सट्टा ) सुरू केला होता. 50 ते 60 परप्रांतीय तरुण बुकिंगचे काम करत होते. या इमारतीच्या परिसरात अनेक निवासी इमारती आहेत.

मात्र रहिवाशांना या अनधिकृत व्यवसाय बाबत माहिती नव्हती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आज पहाटेच्या सुमारास छापा टाकून चौकशीसाठी 50 ते 60 जणांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी बुकिंग साठी वापरले जाणारे मोबाईल, लॅपटॉप आदि साहित्य आढळून आले आहे.

महादेव ऍप द्वारे 24 तास ऑनलाइन जुगार सुरू असल्याने. बुकिंग करणाऱ्या तरुणांची जेवण, निवास व्यवस्था याच इमारतीत करण्यात आली होती. या इमारतीतील विद्युत दिवे व पंखे रात्रभर सुरू असत, इमारतीचे दरवाजे नेहमी बंद असत. अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. घटना स्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कारवाई बाबत गोपनीयता बाळगण्यात येत आहे.

माहितीसाठी गेलेल्या पत्रकारांना प्रवेश दिला जात नाही.पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जुन्नर विभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी आज दुपारी भेट देऊन कारवाईचा आढावा घेतला. याबाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला असता ते म्हणाले चौकशी सुरु आहे. चौकशी पुर्ण झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT