Online Betting sakal
पुणे

Online Betting : महादेव बेटिंग ॲप प्रकरण; ऑनलाइन सट्टेबाजीत ४५२ बँक खात्यातून कोट्यवधींची उलाढाल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी ९३ जणांविरुद्ध गुन्हा, परदेशात पैसा वळविल्याचा संशय.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महादेव बुक बेटिंग ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन सट्टेबाजीसाठी ४५२ बँक खात्यातून कोट्यवधींची उलाढाल झाली आहे. या प्रकरणी ९३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी ८८ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींनी जुगारातील पैसा परदेशात वळविल्याचा संशय आहे.

आरोपींनी ऑनलाइन सट्टेबाजीसाठी ४५२ बँक खात्यांचा वापर केला आहे. ही खाती कोणाच्या नावे आहेत. ऑनलाइन सट्टेबाजीतून मिळालेला पैसा देशविघातक कारवायांत वळविण्यात आला आहे का, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार पसार असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

नारायणगावमध्ये महादेव बेटिंग ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पुणे ग्रामीण पोलिसांच्या बुधवारी स्थानिक गुन्हे शाखा आणि खेड उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने तेथील कॉल सेंटरवर छापा टाकला. या प्रकरणी कुणाल भट, अमजद खान, यश चौहान, समीर युनूस पठाण, रशीद कमाल रफीउल्ली या संशयितांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी कॉल सेंटरमधून ४५ लॅपटॉप, ८९ मोबाईल आणि ४५२ बँक पासबुकसह ६२ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक आणि रवींद्र चौधरी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, किरण अवचर, सतीश होडगर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

Forest Plantation: पुणे वनवृत्तात ४०८ हेक्टरवर ३० लाख रोपे; वनमहोत्सव २०२६ साठी वन विभाग सज्ज

Fake Cosmetics Sale : पुण्यात बनावट सौंदर्य प्रसाधनाची विक्री; औषध विक्रेत्यासह वितरकावर गुन्हा

SCROLL FOR NEXT