पुणे

ॲट्रॉसिटी अंतर्गत भाळवणीतील एकावर गुन्हा

CD

भाळवणीतील एकावर
ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा

मंगळवेढा, ता. २४ : शेळ्या सोडण्यावरून झालेल्या भांडणातून ‘आमच्या रस्त्याने का जातो?’ असे विचारून जातीवाचक शिवीगाळ करत काठीने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी भाळवणी येथील महादेव रेवणसिद्ध साखरे यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी अगतराव पांडुरंग गेजगे (वय ८१, रा. भाळवणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुमारे महिनाभरापूर्वी महादेव रेवणसिद्ध साखरे यांनी त्यांच्या शेतात शेळ्या सोडल्याच्या कारणावरून भांडण झाले होते.
दरम्यान, काल सकाळी दहाच्या सुमारास गेजगे हे समाधान कोडग यांच्या शेतातील सार्वजनिक कच्च्या रस्त्याने सायकलवरून भाळवणी गावाकडे जात होते. त्यावेळी रस्त्यात महादेव साखरे यांनी ‘तुम्ही आमच्या रानातील रस्त्याने का चालला?’ असे विचारून ‘आत्ता तुझे बघतोच म्हणत साखरे यांनी काठीने त्यांच्या डाव्या हाताच्या पोटरीवर मारून जखमी केले. तसेच, ‘तू माझ्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर मी तुझ्याविरुद्ध पोलिस ठाण्यात खोटी तक्रार देईन,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यावरून महादेव रेवणसिद्ध साखरे यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : पंतप्रधान मोदींनी चेन्नईमध्ये विकासकामांची पायाभरणी केली

Solapur Temperature: ‘चित्रा’च्या पहिल्याच दिवशी पारा ३८ अंशांवर, नक्षत्र बदलले मात्र परिस्थिती बदलेना; रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या, ६१ वर्षांचा विक्रम मोडणार?

Yuvraj Singh on Dhoni: ‘तो माझा जवळचा मित्र नव्हता…’ युवराज सिंगने सांगितली माहीसोबतच्या नात्याची Inside Story;माहीने करिअरच्या शेवटी...

सुरुची अडारकर-पियुष रानडे यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, 'आमच्या टीममध्ये आता नवा मेंबर’

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणूक: पहिल्या दोन तासांत साडेबारा टक्के मतदान, सुनेत्रा पवारांचा विश्वास

SCROLL FOR NEXT