Shivneri Fort Sakal
पुणे

Shivneri Fort : शिवजयंतीला शिवनेरीवर पाच दिवस 'महादुर्ग उत्सव'

किल्ले शिवनेरीवर येत्या शिवजयंतीला १८ ते २२ फेब्रुवारी २०२३ दरम्यान राज्य सरकारच्या वतीने पाच दिवस 'महादुर्ग उत्सव' आयोजित करण्यात येणार आहे.

दत्ता म्हसकर

किल्ले शिवनेरीवर येत्या शिवजयंतीला १८ ते २२ फेब्रुवारी २०२३ दरम्यान राज्य सरकारच्या वतीने पाच दिवस 'महादुर्ग उत्सव' आयोजित करण्यात येणार आहे.

जुन्नर - किल्ले शिवनेरीवर येत्या शिवजयंतीला १८ ते २२ फेब्रुवारी २०२३ दरम्यान राज्य सरकारच्या वतीने पाच दिवस 'महादुर्ग उत्सव' आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून आठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकारांना दिली.

आढळराव पाटील म्हणाले, दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती सोहळा शासकीय इतमामात साजरा होतो. मागील दोन वर्षे कोरोनाच्या भयावह परिस्थितीमुळे हा सोहळा मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला होता. कोरोनाचे संकट दूर झाल्याने राज्यातील शिवभक्तांच्या भावनांचा सन्मान करून यंदाची शिवजयंती दैदीप्यमान पद्धतीने साजरी व्हावी, यासाठी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पर्यटन तथा सांस्कृतिक मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेऊन आग्रही मागणी केली होती. या महत्त्वपूर्ण विषयात लक्ष घालून १७ नोव्हेंबर रोजी शासन आदेश पारित केला आहे. त्याद्वारे ता. १८ ते २२ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवनेरीवर महादुर्ग उत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या उत्सवाच्या आयोजनासाठी जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली बारा सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे. यामध्ये विधान परिषदेचे माजी सदस्य प्रवीण दरेकर, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भारतीय पुरातत्व खात्याचे अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, उपविभागीय अधिकारी जुन्नर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महावितरणचे कार्यकारी अभियंता, जुन्नर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक, नाट्यकलावंत जयेंद्र मोरे, विभागीय पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक आदींचा समावेश आहे.

या उत्सवासाठी शासकीय विभागांच्या विविध कार्यक्रमांव्यतिरिक्त आयोजित अन्य कार्यक्रमांसाठी ८ कोटींचा विशेष निधी राज्याच्या पर्यटन खात्याकडून मंजूर करण्यात आल्याची माहिती आढळराव पाटील यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या या महायुती शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवभक्तांच्या भावनांचा आदर सन्मान करणाऱ्या निर्णयाचे तमाम जुन्नरकर तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT