Maharashtra State Board Education ssc exam is over student celebration pune  ssc exam
पुणे

Mahah ssc board : जुलै-ऑगस्टच्या पुरवणी परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ, विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह १८ जूनपर्यंत अर्ज करता येणार

फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइन घेता येईल.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

Mahah ssc board - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आता १८ जूनपर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर अर्ज भरावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या राज्य सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे केले आहे.

राज्य मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये बारावीची पुरवणी परीक्षा होणार आहे. या परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे, आयटीआयमधून ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १८ जूनपर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरता येईल.

फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइन घेता येईल. श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०२३ आणि फेब्रुवारी-मार्च २०२४ अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील.

सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी निर्धारित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बॅंकेच्या खात्यामध्ये जमा करून चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायच्या कालावधीत यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे ओक यांनी कळविले आहे.

बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा -

- विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी मुदत : १५ ते १८ जून

- उच्च माध्यमिक शाळांनी, कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरायचा कालावधी : १९ जून

- शाळांनी, महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाचा कालावधी : २० जून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu crisis updates: जम्मूत परिस्थिती बिकट, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

CM Himanta Biswa Sarma: मुख्यमंत्री सरमा यांनी धुबरी जिल्ह्यासाठी दिले ‘शूट अ‍ॅट साइट’चे ऑर्डर!

Hadapsar News : ओंकार जाधव याने वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी माउंट किलीमांजारो शिखर केले सर

Sachin Tendulkar: जो रुट मास्टर-ब्लास्टरचा विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ; सचिन म्हणतोय, 'तो अजूनही...'

Ganeshotsav: गणपती आगमन-विसर्जनासाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील १२ पूल धोकादायक, महापालिकेचं आवाहन

SCROLL FOR NEXT