तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील तालुकास्तरीय बैठकीत जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले sakal
पुणे

शिरूर तालुक्यात खासदारांतर्फे गुरुवारी महालसीकरण मोहीम

कोव्हिड प्रतिबंधक महालसीकरण मोहीम राबविण्यात येणार

प्रा. नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पुढाकाराने व आमदार ऍड अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुक्यातील सर्व गावात गुरुवारी (ता.२८) कोव्हिड प्रतिबंधक महालसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी दिली. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे महालसीकरण मोहीम संदर्भात मंगळवारी झालेल्या तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सुजाता पवार यांनी माहिती दिली. जगदंब प्रतिष्ठान आयोजित सिरम इन्स्टिट्यूट, नोबेल हॉस्पिटल व पुणे जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने खासदार डॉ. कोल्हे यांच्यातर्फे शिरूर लोकसभा मतदार संघात गुरुवारी महालसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेत १८ वर्षाच्या पुढील सर्व नागरिकांना पहिला व दुसरा डोस मोफत देण्यात येणार आहे.

शिरूर तालुक्यातील सर्व संस्थांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने महालसीकरण मोहीम राबवून १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन सुजाता पवार यांनी केले आहे. २८ तारीख नंतरही उरलेल्या सर्व नागरिकांना लस दिली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, महिला अध्यक्षा विद्या भुजबळ, बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास ढमढेरे, अनिल भुजबळ व विकास शिवले, खरेदी विक्री संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र नरवडे, घोडगंगाचे संचालक पोपट भुजबळ, माजी सभापती आरती भुजबळ, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे व कुसुम मांढरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, माजी उपसभापती जयमाला जकाते, ऍड संपत ढमढेरे आदी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून लसीकरण मोहीम यशस्वी करणार असल्याचे सांगितले.

यावेळी सरपंच अंकिता भुजबळ, तात्यासाहेब सोनवणे, उपसरपंच नवनाथ ढमढेरे, रमेश थोरात, संभाजी भुजबळ, विजय ढमढेरे, उपाध्यक्ष माऊली थेऊरकर, गोविंद ढमढेरे, शहाजी ढमढेरे, अभिजित नरके, सुभाष वडघुले, तेजेस झगडे व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. "तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी तालुक्यात १८ वर्षावरील पहिला डोस २ लाख ९९ हजार व दुसरा डोस २ लाख २५ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे सांगितले. तसेच ८ ऑक्टोंबर पासून राबविलेल्या मिशन कवच कुंडल योजने अंतर्गत ३९ हजार लोकांचा पहिला व दुसरा डोस लसीकरणाचा झाल्याचे सांगितले."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT