पुणे

महाळुंगे इंगळेवासीयांची पाण्यासाठी वणवण

CD

आंबेठाण, ता. ३ : खेड तालुक्यातील औद्योगिकदृष्ट्या विकसित महाळुंगे इंगळे गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आठवड्यातून केवळ एक-दोन दिवस पाणी मिळत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. केंद्र सरकारची जलजीवन योजना अर्धवट अवस्थेत असल्याने आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे नियोजन पूर्णपणे फसल्याने नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची गंभीर वेळ आली आहे.
औद्योगिक वसाहतीमुळे ''श्रीमंत'' ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाळुंगे इंगळे गावात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागत आहे. एकीकडे गावाचा झपाट्याने विकास होत असताना, दुसरीकडे आठवड्यातून फक्त एक ते दोन दिवस होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. उर्वरित दिवस पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने ग्रामपंचायतीच्या श्रीमंतीचा उपयोग काय, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
गावाचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठ्याचे नियोजन जागेवरच थांबले आहे. केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी ''जलजीवन योजना'' गावात सुरू होऊनही ती अपूर्ण असल्याने तिचा अपेक्षित लाभ मिळत नाही. या योजनेवर झालेला खर्च आणि कामाच्या विलंबाचा जाब कोण विचारणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता आश्वासने नको, तर प्रत्यक्ष कृती हवी, अशी नागरिकांची एकमुखी मागणी आहे. जलजीवन योजनेचे काम तातडीने पूर्ण करून कामाची सद्यस्थिती, झालेला खर्च आणि प्रकल्पपूर्तीची निश्चित तारीख जाहीर करावी, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. अन्यथा, श्रीमंतीचा नावलौकिक असूनही नागरिकांच्या घरातील रिकामे हंडे हेच प्रशासनाच्या कारभाराचे वास्तव चित्र ठरेल.

पाणीपुरवठ्याचे वास्तव
सध्याचा पुरवठा : २ लाख लिटर (महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण व एमआयडीसीकडून प्रत्येकी १ लाख लिटर)
पाण्याची तूट : दररोज ३० ते ४० लाख लिटर
परिणाम : आठवड्यातून केवळ १-२ दिवस पाणीपुरवठा

कोरेगाव येथे पंपिंग स्टेशनसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने जलजीवन योजनेचे काम रखडले आहे.
- बी. बी. गोरे, ग्रामविकास अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

Aditya Thackeray: ‘एकरी पाच हजारही उत्पन्न मिळणार नाही’; कपाशीची अवस्था पाहून आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Chhatrapati Sambhajinagar News: अपहरणाची तक्रार, दहा दिवसांचा शोध अन् अखेर चेंबरमध्ये मृतदेह; करमाडमधील कंत्राटदाराच्या मृत्यूचे गूढ कायम

Latest Marathi News Live Update: महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले

Animal Love Story: शर्यतप्रेमी मालक गेला अन् २४ तासांत लाडका बैलही गेला! २७ वर्षे एकमेकांची साथ; मालक अन् पाखऱ्याच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी

SCROLL FOR NEXT