पुणे

महाळुंगेत सर्जा-राजाला पुरणपोळीचा घास

CD

महाळुंगे पडवळ, ता. १० : महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथे श्रावणी बैलपोळ्यानिमित्त शिंगांना रंग व फुगे बांधून बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. त्यामध्ये जवळपास १३० हून अधिक बैल सहभागी झाले होते. येथे डीजेऐवजी ढोल, ताशे व बँजोच्या तालावर सुरू असलेली बैलांची ही मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
विधिवत पूजा करून सर्जा-राजाला पुरणपोळीचा घास भरविण्यात आला. त्यानंतर बैल गावातील मिरवणुकीसाठी आणण्यात आले.
महाळुंगे पडवळ येथे जिल्ह्यात सर्वांत मोठा श्रावणी बैलपोळा भरतो. सकाळी ग्रामदैवत मारुती मंदिरात अभिषेक, काठी मिरवणूक, बबन सैद, दिनकर दातखीळे, मधुकर घोडेकर, नवनाथ आवटे, सदाशिव चासकर यांचा कलगी तुऱ्याचा कार्यक्रम झाला. सायंकाळी दत्त मंदिरातील नंदीस पोलिस पाटील सविता पडवळ व प्रशासक सुजाता चासकर यांच्या हस्ते बाशिंग बांधण्यात आले. देशभक्त हुतात्मा बाबू गेनू सैद व माजी आमदार (कै.) अण्णासाहेब आवटे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शेतकऱ्यांनी बैलांना अंघोळ घालून अंगावर झुल चढविली. शिंगांना रंग व फुगे बांधून बैलांना सजविण्यात आले.
डॉ. नितीन अण्णासाहेब पडवळ यांचा मानाचा बैल सन्मानपूर्वक पोलिस पाटील सविता भरत पडवळ यांच्या हस्ते सोडण्यात आला. अग्रभागी ढोल लेझीम, झांजपथक होते. त्यानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत भंडाऱ्याची उधळण करीत बैलांच्या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.

कुस्त्यांचा आज जंगी आखाडा
महाळुंगे येथे श्रावणी बैलपोळ्यानिमित्त शुक्रवारी (ता. ११) दुपारी कुस्त्यांचा आखाडा आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, पारनेर, श्रीगोंदा आदी दूरवरच्या भागातून पहिलवान येथे मुक्कामी आले आहेत. आखाड्याची तयारी पूर्ण झाली आहे.

03843

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT