accused arrested sakal
पुणे

Chakan Crime : दुचाकीच्या चाकाच्या रंगावरून घरफोडी करणाऱ्या आरोपीला महाळुंगे पोलिसांनी पकडले; २९ लाखांचा माल हस्तगत

मोई, ता. खेड येथील घरफोडी करून सुमारे तीस लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते.

हरिदास कड

चाकण - मोई, ता. खेड येथील घरफोडी करून सुमारे तीस लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. स्कुटीच्या चाकाच्या रंगावरून घरफोडी करणाऱ्या आरोपीला महाळुंगे पोलिसांनी कुरुळी गावच्या हद्दीत डोंगरे वस्तीजवळ ता. 2 ला रात्री सव्वा नउच्या सुमारास हटकले असता पळून जात असताना शिताफिने पकडले.

पोलिसांच्या कारवाईत आरोपी आमिर शब्बीर शेख (वय -25 वर्ष, सध्या रा. निगडी प्राधिकरण, ता. हवेली, जि. पुणे. मूळ रा. वडेश्वर काटे, ता. वडगाव मावळ, जि. पुणे) या आरोपीला अटक केली आहे. त्याने २५ डिसेंबरला मोई येथे घरफोडी करून तीस लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी पोलिसात फिर्याद नितीन शहाजी कर्पे यांनी दिली होती. महाळुंगे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले दुचाकीच्या व चाकाच्या रंगावरून आरोपीला पकडले.

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ता. २५ ला सायंकाळी पाच ते रात्री पावणे दहा वा. दरम्यान मोई येथे घरफोडी झाली होती. याबाबत नितीन शहाजी कर्पे यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

चोरट्याने कर्पे यांच्या घराच्या पाठीमागील बाजूच्या जिन्याजवळील खिडकीचे लोखंडी ग्रील कापून आत प्रवेश करत घरातून ४७ तोळे सोने आणि ५ लाख १५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३० लाख ४८ हजार ४०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या प्रकारानंतर महाळुंगे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात एक दुचाकी संशयितपणे जाताना दिसली. त्या लाल रंगाच्या दुचाकीचा शोध पोलिसांनी सुरु केला. मोई, निघोजे, कुरुळी परिसरात गस्त घालताना पोलिसांना संशयित एक लाल दुचाकी दिसली. पोलिसांनी त्या दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो दुचाकीसह पळून जाऊ लागला. त्यावेळी महाळुंगे पोलिसांनी शिताफीने त्याचा पाठलाग करून त्या दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने कर्पे यांच्या घरी चोरी केल्याचे कबूल केले.

पोलिसांनी आरोपी आमिर शेख याच्याकडून ४७.८ तोळे सोन्याचे दागिने, ३ लाख रुपये रोख रक्कम आणि दुचाकी असा सुमारे २९ लाख ३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी, पोलीस अंमलदार राजु कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, संतोष होळकर, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, किशोर सांगळे, पोलीस शिपाई शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, राहुल मिसाळ, अमोल माटे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT