Metro 
पुणे

स्थानिकांना ‘महामेट्रो’त प्राधान्य

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पात काम करणारे ६० टक्के कर्मचारी मराठी आहेत. प्रकल्पाच्या कामासाठी मनुष्यबळ नियुक्त करताना स्थानिक आणि मराठी व्यक्तींना प्राधान्य द्यावे, असे आदेश संबंधित कंत्राटदारांना दिले आहेत, असे महामेट्रोने एका पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. 

मेट्रो प्रकल्पात मनुष्यबळ नियुक्त करताना मराठी आणि स्थानिक व्यक्तींना प्राधान्य द्यावे, अशी मागणी करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी महामेट्रोच्या कार्यालयासमोर काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्याची दखल घेऊन महामेट्रोने शिंदे यांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये म्हटले आहे, की महामेट्रो हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. 

या प्रकल्पात वरिष्ठ पदांवर तज्ज्ञ आणि अनुभवी अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या केल्या आहेत. मात्र पर्यवेक्षकीय स्तरावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या करताना त्यांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्‍यक आहे. अपर्यवेक्षकीय पदांसाठी उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे, त्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे आणि मराठी वाचता, लिहिता येणे आवश्‍यक आहे. महामेट्रोमध्ये १६० अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यापैकी ६० टक्के कर्मचारी मराठी आहेत. अपर्यवेक्षकीय कर्मचारी आवश्‍यकतेनुसार स्थानिक एजन्सीमार्फत पुरविण्यात येत असून, त्यातही ७० टक्के कर्मचारी हे मराठी भाषिक आहेत.’’ महामेट्रोचे महाव्यवस्थापक (एचआर) डॉ. हेमंत सोनावणे यांनी हे पत्र शिंदे यांना पाठविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT